Class 10 student gives birth after board exam Marathi Crime News : सरकारी निवासी शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीने बोर्डाची परीक्षा दिल्यानंतर एका बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यातील सरकारी निवासी शाळेत हा प्रकार घडला आहे. शाळेच्या वसतिगृहात राहणार्‍या या मुलीने बोर्डाची परीक्षा देऊन परतल्यानंतर चित्रकोंडा उपविभागीय रुग्णालयात मुलाला जन्म दिला. मीडिया रिपोर्टनुसार ही मुलगी नियमित शाळेत जात राहिली, इतकेच नाही तर तिने बोर्डाची परीक्षा देखील दिली. मात्र तिच्या स्थितीबद्दल शाळा प्रशासनाला कसलीही कल्पना नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या मुलीच्या पालकांनी शाळेच्या प्रशासनाला यासाठी जबाबदार धरले आहेत. तर शिक्षकांनी मुलगी राहत होती त्या हॉस्टेलच्या वॉर्डनवर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर चित्रकोंडा पोलिस आणि जिल्हा कल्याण अधिकारी (DWO) यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. परिस्थितीकडे दुर्लक्ष कसे झाले याबद्दल आणि पुढे काय कारवाई करावी याचा निर्णय घेण्यासाठी अधिकाऱ्यांवर आता दबाव वाढला आहे.

चित्रकोंडा पोलिसांना या घटनेबद्दल माहिती देताना निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये सांगण्यात आले आहे की, “घटनेचा तपास सुरू आहे. कुटुंबाकडून अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही कारण ते अजूनही रुग्णालयात आहेत, परंतु त्यांनी परतल्यानंतर तक्रार दाखल करतील असे आम्हाला सांगितले आहे.”

पोलिसांनी काय सांगितलं?

पोलिसांच्या निवेदनात सांगण्यात आले आहे की, १५ वर्षीय मुलीचे कथितरित्या एका स्थानिक मुलाबरोबर प्रेमसंबंध होते आणि तो मुलगाच या मुलाचा पिता आहे. आम्ही आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत तरी शाळा किंवा जिल्हा प्रशासनाकडून या प्रकरणाबद्दल अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मुलगी आणि तिच्या बाळावर सध्या मलकानगिरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असेही पोलिसांनी दिलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे.