Class 3 girl dies of cardiac arrest in Gujarat school: दिवसेंदिवस आरोग्य विषयक समस्य गंभीर बनत चालल्या आहेत. आता पौढांबरोबरच लहान मुलांमध्ये देखील हृदयविकाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. हृदयविकाराच्या झटक्याने लहान मुलांचा मृत्यू होण्याच्या प्रकरणांमध्ये आणखी एकाची भर पडली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये समोर आलेल्या या घटनेत इयत्ता ३ मध्ये शिकणाऱ्या आठ वर्षांच्या मुलीचा शुक्रवारी तिच्या शाळेत मृत्यू झाला आहे. तिचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने (cardiac arrest) झाल्याचे सांगितले जात आहे. पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळालेल्या माहितीनुसार, या मुलीचे नाव गार्गी रानपारा (Gargi Ranpara) असून ती सकाळी थलतेज भागात असलेल्या झेबर स्कूल फॉर चिल्ड्रनमध्ये कोसळली. दरम्यान या मुलीच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

सकाळी आपल्या वर्गाकडे जात असताना लॉबीमधील खुर्चीवर बसल्याबरोबर ती मुलगी बेशुद्ध पडली, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका शर्मिष्ठा सिन्हा यांच्या हवाल्याने पीटीआयने दिली आहे.

कर्नाटकामध्येही असाच प्रकार

कर्नाटक येथे काही दिवसांपूर्वी अशाच एका घटनेत बंगळुरूपासून १६० किलोमीटर अंतरावर असलेल्या चामराजनगर येथे एका आठ वर्षीय विद्यार्थ्यी अचानक कोसळला आणि त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

अहमदाबाद येथे नेमकं काय झालं?

शाळेच्या प्रशासनाने दाखवलेल्या सीसीटीव्ही व्हिडीओनुसार गार्गी रामपारा ही लॉबीमधून तिच्या वर्गाकडे चालत जाताना दिसत आहे. पण मध्येच ती एका खुर्चीवर बसते. नंतर तेथील शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ती बेशुद्ध झाल्यानंतर खुर्चीवरून खाली सरकताना दिसून आली.

सकाळी शाळेत आली तेव्हा गार्गी व्यवस्थित होती. जेव्हा ती पहिल्या मजल्यावरील आपल्या वर्गाकडे जात होती तेव्हा ती वरांड्यात खुर्चीवर खाली बसली आणि अचानक खाली कोसळली. शिक्षकांनी तिला सीपीआर दिला आणि रूग्णवाहिका बोलवण्यात आल, असे मुख्याध्यापीका शर्मिष्ठा सिन्हा यांनी सांगितले. त्यानंतर या मुलीला वाहनातून जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तिथल्या डॉक्टरांनी सांगितले की गार्गीला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांनी तिला वाचवण्याता प्रयत्न केला आणि तिला व्हेंटिलेटरवर देखील ठेवले, पण ती वाचू शकली नाही, असेही सिन्हा म्हणाल्या.

हेही वाचा>> महाराष्ट्रातील मद्यप्रेमींवर महसूल वाढवण्याची जबाबदारी! रिकामी तिजोरी भरण्यासाठी सरकार कर वाढवण्याच्या तयारीत

दरम्यान सेक्टर-१ चे सहपोलीस आयुक्त नीरज बडगुजर यांनी या संपूर्ण घटनेबद्दल बोलताना सांगितले की, आम्हाला रुग्णालयातून फोन आला की दाखल केल्यानंतर एका शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. आम्ही आमच्या बाजूने तपास सुरू केला आहे आणि तिच्या मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे .

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Class 3 girl dies of cardiac arrest in gujarat school after incident in karnataka marathi news rak