भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि नागपूरमधील पक्षाचे लोकसभेसाठीचे उमेदवार नितीन गडकरी यांना प्राप्तिकर विभागाने क्लीन चीट दिली आहे. गडकरी यांच्याविरूद्ध प्राप्तिकर खात्याकडून कोणतीची चौकशी सुरू नसून, त्यांच्याविरुद्ध एकही चौकशी प्रलंबित नसल्याचे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे.
गडकरी यांच्याविरुद्ध प्राप्तिकर विभागाकडे किती प्रकरणे प्रलंबित आहेत, तसेच कोणत्या प्रकरणांमध्ये त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू आहे, ही माहिती माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्राप्तिकर विभागाला विचारण्यात आली होती. सुमित दलाल यांनी ही माहिती मागितली होती. त्याला उत्तर देताना प्राप्तिकर विभागाने गडकरी यांच्याविरुद्ध एकाही प्रकरणी चौकशी सुरू नसल्याचे म्हटले आहे. प्राप्तिकर विभागाच्या या माहितीमुळे गडकरी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Story img Loader