रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेला रेल्वे अर्थसंकल्प देशाच्या अर्थव्यवस्थेत दूरगामी आणि सकारात्मक काम करण्याला मदत करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. मला आधीच्या सरकारच्या रेल्वे अर्थसंकल्पांवर टीका करायची नाही, पण आमच्या सरकारच्या रेल्वे अर्थसंकल्पामुळे अडीच पटीने गुंतवणूक वाढली असल्याची माहिती देखील मोदींनी यावेळी दिली.
स्वच्छता, सुविधा आणि अत्याधुनिकीकरण हा गेल्या दोन रेल्वे अर्थसंकल्पांचा केंद्रबिंदू असून, आम्ही रेल्वे प्रवाशांना उत्तम सेवा देण्यास कटीबद्ध असल्याचेही मोदी पुढे म्हणाले.
सर्वसामान्यांसाठी ‘अंत्योदय’ ही विनाआरक्षित रेल्वेगाड्या तसेच ‘हमसफर’, ‘तेजस’ आणि ‘उदय’ या नव्या रेल्वेगाड्या सुरू करण्याच्या रेल्वेमंत्र्यांच्या घोषणेचे मोदींनी स्वागत केले.
रेल्वे अर्थसंकल्प दूरगामी आणि सकारात्मक परिणाम करणारा- नरेंद्र मोदी
स्वच्छता, सुविधा आणि अत्याधुनिकीकरण हा गेल्या दोन रेल्वे अर्थसंकल्पांचा केंद्रबिंदू
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड

First published on: 25-02-2016 at 15:50 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cleanliness customer benefit technology upgradation has been the mantra of past two railway budgets says pm modi