एकीकडे न्यायालयाने स्वयंघोषित संत आसाराम बापू यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला असताना, दुसरीकडे त्यांचा सहायक शिवा याच्या कबुली जबाबातून त्यांच्यापुढील अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे.
आसाराम यांची ‘ध्यान की कुटिया
आसाराम बापू रात्री एकांतात महिलांना ‘ध्यान की कुटिया’मध्ये भेटत होते, अशी खळबळजनक माहिती शिवाने जोधपूर पोलिसांना दिलीये. त्यातच त्याच्या मोबाईलमध्ये मिळालेल्या एका क्लिपमुळे तर आसाराम बापू यांच्या ‘लीला’ पोलिसांना प्रत्यक्ष दिसल्या असल्याचे समजते. शिवाच्या मोबाईलमध्ये असलेल्या या क्लिपमध्ये आसाराम बापू एका महिलेच्या गळ्यावर आणि खांद्यावर हात फिरवत असल्याचे दिसून आल्याचे समजते. याबाबत पोलिसांनी अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. शिवाच्या मोबाईलमध्ये आणखी काही क्लिप आहेत का, याचाही शोध सध्या घेण्यात येतो आहे.
‘मला अटक केली तर त्याची जबर किंमत निवडणुकीत मोजावी लागेल’
आसाराम बापू ज्या महिलांशी एकांतात भेटू इच्छित होते, त्यांना आसाराम यांच्यापर्यंत घेऊन जाण्यात शिवा महत्त्वाची भूमिका बजावत होता. त्यामुळे पोलिस शिवाकडे कसून चौकशी करीत आहेत.
महिलांपासून लांब राहण्याचा रामदेव बाबांचा साधू-संतांना सल्ला! 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा