नवी दिल्ली : नव्याने सुरू झालेल्या शाब्दिक युद्धात, दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आपल्याविरुद्ध ‘दिशाभूल करणारी व मानहानीकारक’ वक्तव्ये करत असल्याचा आरोप केला. त्यावर, कंझावलासारखी घटना पुन्हा घडू नये यासाठी नायब राज्यपालांनी कायदा व सुव्यवस्था परिस्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे प्रत्युत्तर केजरीवाल यांनी त्यांना दिले.

योग्य प्रकारे कार्य करता यावे यासाठी सूर्य व चंद्र हे अंतराळात आपापल्या क्षेत्रात संचालन करतात असे उदाहरण देऊन, दिल्लीतील यंत्रणा सुरळीतपणे चालाव्यात यासाठी आपल्याला काम करण्याची मुभा द्यावी, असे आवाहन केजरीवाल यांनी सक्सेना यांना केले.

Sadhguru disheartened over Parliament disruptions on adani issue
Sadhguru on Adani: ‘उद्योगपतींवरून संसदेत रणकंदन नको’, अदाणींना समर्थन देत सद्गुरुंनी व्यक्त केली नाराजी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
News About Loksabha
Parliament : संसदेत उफाळून आलेला विधेयकांच्या नावांचा वाद काय? विरोधी पक्षांनी नेमकं काय म्हटलं आहे?
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Ramdas Athawale On Raj Thackeray
Ramdas Athawale : “मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, रामदास आठवलेंचं मोठं विधान

सक्सेना यांनी केजरीवाल यांना पत्र लिहिल्यानंतर या दोघांतील नवे भांडण सुरू झाले. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया व ‘आप’च्या आमदारांसह १६ जानेवारीला राजनिवासावर काढलेल्या मोर्चादरम्यान केजरीवाल यांनी ‘राजकीय अभिनिवेश’ दाखवला, असा आरोप सक्सेना यांनी या पत्रात केला. त्यांनी केजरीवाल यांना भेटीचे आमंत्रणही दिले. या आमंत्रणासाठी केजरीवाल यांनी सक्सेना यांचे आभार मानले आणि शनिवारी भेटीची वेळ मागितली. आपल्यासोबत आपले मंत्री व आमदारही असतील, असे त्यांनी सांगितले.

आपण केजरीवाल यांना भेटीसाठी बोलावले होते, मात्र आपण आपल्या सर्व आमदारांसोबतच येऊ या सबबीवर मुख्यमंत्री आपल्याला भेटले नाहीत, याचा सक्सेना यांनी पत्रात उल्लेख केला.

‘गेल्या काही दिवसांत तुम्ही विधानसभेत व बाहेरही अनेक दिशाभूल करणारी, खोटी व मानहानीकारक वक्तव्ये केल्याचे माध्यमांतील वृत्तांमधून माझ्या निदर्शनास आले आहे’, असे सक्सेना यांनी पत्रात नमूद केले आहे.

केजरीवाल यांचा आरोप

‘सक्सेना हे दिल्ली शहरातील कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष देण्याऐवजी निर्वाचित सरकारच्या कामांमध्ये हस्तक्षेप करताना दिसत आहेत’, असा आरोप केजरीवाल यांनी प्रत्युत्तरात लिहिलेल्या पत्रात केला आहे.

Story img Loader