“दिल्लीचे शहराचे स्वतःचे प्रदूषण सुरक्षित मर्यादेत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरातील प्रदूषणात वाढ होत आहे. शेजारच्या राज्यांतील शेतकऱ्यांनी गवत जाळणं सुरू केल्यामुळे प्रदूषणात वाढ नोंदवण्यात येत आहे. दिल्लीमध्ये प्रदूषण २५% पेक्षा कमी झाले आहे. मात्र, शहरातील प्रदूषण मर्यादित ठेवायचं असेल तर बाहेरून येणाऱ्या प्रदूषणाबरोबरच दिल्लीचे प्रदूषण आणखी कमी करावे लागेल,” असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय. प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्लीमध्ये हिवाळी कृती योजना लागू करण्यात आली आहे. त्यांनी दिल्लीच्या लोकांना तीन विनंत्या आहेत. शिवाय त्यांनी खासगी वाहन वापरणाऱ्या लोकांना एक महत्वाचं आवाहन केलं आहे.  

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय की, पहिलं म्हणजे रेड लाइन ऑन गाडी कॅम्पेनचा भाग व्हा. दुसरे म्हणजे, आठवड्यातून एकदा तरी खासगी कार किंवा स्कूटी/बाईक वापरू नका आणि सार्वजनिक वाहतूक वापरा. तिसरे म्हणजे ग्रीन दिल्ली अॅप डाउनलोड करा आणि आजूबाजूला पसरणाऱ्या प्रदूषणाबद्दल तक्रार करा. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी मंगळवारी ‘अॅडव्हान्स ग्रीन दिल्ली’ अॅप आणि ‘ग्रीन रूम’ लाँच केले. यावेळी गोपाल राय म्हणाले की, “गेल्या वर्षी ग्रीन दिल्ली अॅपचे फक्त अँड्रॉइड व्हर्जन होते. त्यासंदर्भात आलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे आणि आता हे अॅप IOS वरही लाँच करण्यात आले आहे.  आयओएसवरही सुरू करण्यात आले आहे. हे २७ विभागांचे संयुक्त व्यासपीठ आहे. त्यात केंद्र सरकार आणि दिल्ली सरकार आणि महानगरपालिकेचे विभाग देखील आहेत. यामध्ये नागरिकांना १० प्रकारच्या तक्रारी करता येतात.”

ग्रीन रूममध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांना स्वतंत्र प्रशिक्षण देण्यात आले आहे. गेल्या वर्षी एकूण २७ हजार तक्रारी आल्या होत्या त्यापैकी २३ हजार तक्रारींचे निराकरण करण्यात आले. कॉर्पोरेशन, डीडीए आणि पीडब्ल्यूडीला सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, असंही गोपाल राय यांनी सांगितलं.

Story img Loader