भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या कथिक आक्षेपार्ह व्हिडीओवरून महाराष्ट्राच्या विधीमंडळात जोरदार गदारोळ झाला. विरोधकांनी आक्रमक होत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. दुसरीकडे राष्ट्रीय पातळीवर भाजपाच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि विरोधकांकडून बैठका सुरू आहेत. एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीत असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (१८ जुलै) विरोधकांवर सडकून टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एकनाथ शिंदे म्हणाले, “महाराष्ट्रात अजित पवार आणि त्यांचे सहकारी भाजपा-शिवसेना युतीबरोबर आले आहेत. त्यामुळे आता महायुती झाली आहे. परिस्थिती आता बदलली आहे. सरकार अगदी मजबूत झालं आहे. ही एका विचाराची युती आहे. विरोधक सगळे एकत्र येऊनही त्यांना एक नेता निवडता आलेला नाही. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय आहे.”

हेही वाचा : “किरीट सोमय्या नग्न झाले, पेन ड्राईव्ह घेऊन सभागृहात…”, अंबादास दानवेंचा हल्लाबोल

“काँग्रेसने ५०-६० वर्षात केलं नाही, ते मोदींनी ९ वर्षात केलं”

“विरोधकांमध्ये एकमत नाही. काँग्रेसने जेवढं काम मागील ५०-६० वर्षात केलं नाही, तेवढं मोदींनी ९ वर्षात केलं आहे. अर्थव्यवस्था एका उंचीवर नेऊन ठेवली आहे. जगात अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडत आहेत. मात्र, आपल्या देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत झाली आहे. आपली अर्थव्यवस्था १० व्या क्रमांकावरून ५ व्या क्रमांकावर आली आहे,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

हेही वाचा : “व्हायरल व्हिडीओतील ‘ती’ महिला…”, किरीट सोमय्या प्रकरणावर अनिल परब आक्रमक

“२०२४ मधील निवडणुकीचा निकाल निश्चित झाला आहे”

“जगभरात भारताचं नाव सन्मानाने घेतलं जातं. यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदींची मेहनत आहे. त्यामुळे २०२४ मधील निवडणुकीचा निकाल निश्चित झाला आहे. विरोधक २०१४, २०१९ मध्येही एकत्र आले होते. त्यांचा एकच अजेंडा आहे, तो म्हणजे मोदींवर आरोप करणे. ते जितके आरोप करतील तितकी एनडीए मजबूत होईल आणि अधिक जागा निवडून येतील आणि नवा विक्रम होईल,” असा विश्वास मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला.