CM Himanta Sarma : काही दिवसांपूर्वी कोलकातातील एका सभेत बोलताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती. कोलकातातील डॉक्टर तरुणींच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या आडून पंतप्रधान मोदी पश्चिम बंगाल पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं त्या म्हणाल्या होत्या. तसेच आज पश्चिम बंगाल पेटवलं तर उद्या आसाम, झारखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली, असे उतर राज्य पेटवतील, असा इशाराही त्यांनी दिला होता. दरम्यान, या टीकेवरून आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लोबोल केला आहे. तसेच आसामच्या इतर मंत्र्यांनीही ममता बॅनर्जी यांच्या या विधानाचा विरोध केला आहे. याशिवाय पश्चिम बंगाल भाजपाचे प्रमुखांनी थेट अमित शाह यांना पत्र लिहित ममता बॅनर्जी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा – President Droupadi Murmu : “बस आता खूप झालं”, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची संतप्त प्रतिक्रिया; ‘या’ मुद्द्यावर केलं भाष्य!

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, “अशाप्रकारे आसामला धमकी देण्याची तुमची हिंमत कशी झाली? ममता बॅनर्जींनी आम्हाला डोळे दाखवायचा आणि त्यांच्या अपयशाच्या राजकारणाद्वारे भारताला पेटवण्याचा प्रयत्न करू नये. सार्वजनिक व्यासपीठावरून अशा प्रकारची भाषा करणं तुम्हाला शोभत नाही.”

याशिवाय आसामचे अन्य एक मंत्री पीयूष हजारिका यांनीही ममता बॅनर्जींच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. “ममता बॅनर्जी यांनी आधी त्यांच्या राज्यातली कायदा सूव्यवस्था नीट सांभाळावी. त्या त्यांचं राज्य सांभाळू शकत नाही, तरीही आम्हाला धमकी देण्याचा प्रयत्न करत आहेत. ममता बॅनर्जी या वरिष्ठ नेत्या आहेत. बऱ्याच वर्षांपासून त्या मुख्यमंत्री आहेत. त्यांनी अशा प्रकारे बोलणं योग्य नाही”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – West Bengal : पश्चिम बंगालमधील ‘बंद’ला हिंसक वळण; तृणमूल-भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, गोळीबार झाल्याचाही दावा, नेमकं काय घडतंय?

ममता बॅनर्जींच्या या विधानानंतर पश्चिम बंगालचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहीत, ममता बॅनर्जी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “ममता बॅनर्जी यांनी जे विधान केलं आहे, ते अतिशय दुर्देवी आहे. हे एका संविधानीक पदावर बसलेल्या व्यक्तीचं विधान नसून एका देशद्रोही व्यक्तीचं विधान आहे. मी गृहमंत्री अमित शाह यांनी विनंती करतो, की त्यांनी या विधानाची गंभीरपणे दखल घेऊन, योग्य ती कारवाई करावी”, असं त्यांनी पत्रात म्हटलं.