येत्या काही दिवसांत देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यासाठी सगळ्याच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. तसेच निवडणुकांच्या या आखाड्यात आता वेगवेगळ्या नेत्यांकडून एकमेकांवर टीकास्त्र सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. धर्मपुरी येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना “आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटी, पोकळ आश्वासने देत आहेत आणि जनतेला खोटी आपुलकी दाखवत आहेत”, असा आरोप तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मोदींवर केला आहे.

“केंद्र सरकार राज्यांना समान वागणूक देत नाही”

“जसे आम्ही राज्यातील सर्व जिल्हे समान मानतो, तसे भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सर्व राज्यांकडे समानतेने पाहत नाही. तर डीएमके सरकार नेहमीच राज्याच्या जनतेसाठी काम करत आहे”, असं ते म्हणाले. “केंद्र सरकारने सर्व राज्यांचा आदर केला पाहिजे आणि त्यांचे पालनपोषण केले पाहिजे, परंतु त्याऐवजी ते राज्यांच्या परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्यांना उद्ध्वस्त करून केंद्र सरकार त्यांची भाषा, परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे”, असा घणाघात त्यांनी केला.

Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Dhananjay Munde
Dhananjay Munde : “पंकजाताईने मन मोठं केलं म्हणून…”, धनंजय मुंडेंचं परळीकरांसमोर वक्तव्य; म्हणाले, “मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी…”
telangana news
भाजपाचे नेते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे चीअरलीडर्स आहेत; केटी रामाराव यांचा आरोप!
What Justice Chandiwal Said About Sachin Waze?
Justice Chandiwal : जस्टिस चांदिवाल यांचं वक्तव्य, “सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, त्यांनी मला समित देशमुखांचा मेसेज..”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”

तामिळनाडूच्या वारंवार दौऱ्यांचा घेतला समाचार

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध राज्यांचे दौरे करताना दिसत आहेत. “तामिळनाडूतील जनता या दौऱ्यांकडे रिकाम्या सहली म्हणून पाहत आहे. अशा सहलींमुळे विकास होत नाही. ते हे दौरे करून फक्त एक नाटक करत आहेत. दुसरं काहीही नाही. मदुराईमध्ये एम्ससाठी २०१९ मध्ये त्यांनी भूमीपूजन केले आणि निवडणूक संपल्यानंतर ते काम थांबवलं गेलं. पंतप्रधानांनी निवडणुकीपूर्वी एलपीजी दरात कपात करण्याची घोषणा केली होती. गेल्या १० वर्षांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचे दर ५०० रुपयांनी वाढले. आणि आता मोदी सरकारनं त्यात १०० रुपयांनी कपात केली. हा घोटाळा नाही का? लोकांची फसवणूक करण्याचा यापेक्षा वाईट मार्ग असू शकतो का?” अशीही टीका त्यांनी केली.

स्टॅलिन पुढे म्हणाले की, “गेल्या वर्षी चेन्नई आणि थुथुकुडी येथे आलेल्या पुराच्या वेळीही मोदींनी राज्याला भेट दिली नाही. मोदी असं म्हणाले होते, की लोकांच्या विकासासाठी असलेल्या निधीचा अपव्यय होऊन त्यातून आपण लोकांची फसवणूक होऊ देणार नाही. पण त्यांनी तामिळनाडूला कोणताही निधी दिला नाही. आम्हाला पूर मदत निधीचे ३७ हजार कोटी रुपये मिळाले, पण जीएसटी भरपाईचे २० हजार कोटी मात्र अजून मिळालेले नाहीत. मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मोदी सरकारनं एकही पैसा दिला नाही. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी दोन तृतीयांश निधी राज्याकडून दिला जातो. तोही दिला नाही. जल जीवन योजनेत राज्याचा वाटा ५० टक्के आहे. यावरून असेच दिसून येते की, राज्याकडून पैसे घेऊन पंतप्रधान मोदी योजना तयार करतात आणि स्वतःची प्रसिद्धी करून घेतात. ते राज्यात निवडणुकीच्या काळात केवळ रिकाम्या हाताने येत आहेत आणि रिकामी, खोटी आश्वासने देत आहेत. पंतप्रधान लोकांप्रती खोटी आपुलकी दाखवत आहेत”, अशा शब्दांत स्टॅलिन यांनी मोदींना लक्ष्य केलं.