देशात करोनाचे रुग्ण वाढत असल्याने अनेक राज्यांनी लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. तसेच काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत. लॉकडाउनचा सकारात्मक परिणाम दिसत असल्याने आणि आरोग्य यंत्रणेवरील तणाव कमी करण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाउनचा अवधी वाढवला. त्यामुळे गेल्या काही दिवसात करोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मात्र लॉकडाउनचा अवधी वाढवत असताना अर्थचक्रावरही परिणाम होत आहे. त्यामुळे आता मध्य प्रदेश सरकारनं अनलॉकच्या दिशेने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. १ जूनपासून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु होईल असं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘लॉकडाउन आपण जास्त कालावधीसाठी ठेवू शकत नाही. आपल्याला हळूहळू अनलॉक करावं लागणार आहे. राज्यात करोना रुग्णांची टक्केवारी ५ टक्क्यांवर आली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. राज्यात आता रिकव्हरी रेट ९० टक्के झाला आहे. करोना स्थिती आता नियंत्रणात आहे. त्यामुळे आता अनलॉकच्या दिशेनं पावलं उचलणं गरजेचं आहे’, असं मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं.

‘राज्यात अनलॉकसाठी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जात आहे. लवकरच अनलॉकची योजना जनतेसमोर ठेवली जाईल.’, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

सोशल मीडियावरून ‘तो’ शब्द असलेला मजकूर वगळा; भारत सरकारचं सोशल मीडिया कंपन्यांना पत्र

मध्य प्रदेशमध्ये मागच्या २४ तासात ४ हजार ३८४ रुग्णांची नोंद झाली आहे. तर ७९ जणांचा करोनामुळे जीव गेला आहे. राज्यात आतापर्यंत ७ लाख ५७ हजार ११९ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर एकूण मृतांचा आकडा ७ हजार ३९४ वर पोहोचला आहे.