आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत केंद्र सरकारने सीएनजीच्या किमती जरी किलोमागे १५ रुपयांनी कमी होणार असल्याचे जाहीर केले असले, तरी हा ‘सरकारी दिलासा’ तात्पुरताच असून एप्रिलच्या मध्यावर सीएनजी किमती किलोमागे किमान साडे दहा रुपयांनी वाढतील, असे भाकीत गोल्डमन सॅकने वर्तवले आहे. सध्या भारतात प्रति ब्रिटिश औष्मिक एककासाठी नैसर्गिक वायूकरिता ४.२ अमेरिकी डॉलर इतके मूल्य अदा करावे लागते. मात्र येत्या एप्रिल महिन्यापासून रंगराजन यांनी तयार केलेले सूत्र अमलात आणल्यानंतर याच किमती ७.८ डॉलपर्यंत वाढतील, असा ‘गोल्डमन सॅक’चा दावा आहे.
येत्या १ एप्रिलपासून सरकारतर्फे देण्यात येणारी अनुदाने बंद होण्याची शक्यता आहे, आणि असे झाल्यास सीएनजीच्या किमतींमध्ये किमान १० रुपये ६० पैशांनी वाढ करण्यावाचून तसेच पीएनजीच्या किमतीत ८ रुपये प्रति घनमीटर इतकी वाढ करण्यावाचून गत्यंतर राहणार नाही, असेही गोल्डमन सॅकच्या अहवालात म्हटले आहे.

Story img Loader