कोळसा घोटाळाप्रकरणी सीबीआयने गुरुवारी राज्यसभा खासदार विजय दर्डा, त्यांच्या मुलगा देवेंद्र यांच्यासह पाच जणांवर दिल्ली न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. कोळसा खाणींचे वाटप करताना गैरव्यवहार करण्यात आला, असा आरोप या पाच जणांवर ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या घोटाळय़ाप्रकरणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असून, त्यापूर्वीच सीबीआयने हे आरोपपत्र दाखल केले.
नागपूरस्थित एएमआर आयर्न आणि स्टील प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचे मालक असलेल्या विजय दर्डा यांच्यासह अरविंद कुमार जयस्वाल, मनोज जयस्वाल, रमेश जयस्वाल आणि देवेंद्र दर्डा या कंपन्यांच्या संचालकांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. कोळसा मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांवरही आरोपपत्र ठेवण्यात आले आहे, मात्र त्यांची नावे उघड करण्यात आलेली नाही.
एएमआर आयर्न आणि स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांनी कोळसा खाणींसाठी अर्ज केले होते. मात्र या कंपन्यांच्या समूह कंपन्यांना या पूर्वीच पाच खाणींचे वाटप करण्यात आले होते. ही माहिती गुप्त ठेवून या कंपन्यांनी सरकारची फसवणूक केल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा