गोव्यातील खाणींमुळे राज्याची भरभराट झाली असून त्यांच्याकडे केवळ एकाच दृष्टिकोनातून पाहू नका व त्यांना खलनायक ठरवू नका, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी शुक्रवारी येथे केले. ब्रिटिश बिझनेस ग्रुपने आयोजित केलेल्या एका परिसंवादात ते बोलत होते.
गोव्यामधील खाण व्यवसाय सध्या कमालीचा बदनाम झाला असून त्यास खलनायक ठरवले जात आहे. मात्र याच खाणींमुळे अगणित संपत्ती आणि रोजगार मिळाल्याने आपल्या राज्याची भरभराट झाल्याच्या वास्तवाकडे डोळेझाक केली जात आहे, असे ते म्हणाले. अर्थात, पर्यावरणासाठी घातक असणाऱ्या कोणाचाही बचाव अथवा कोणत्याही वाईट शक्तींना पाठीशी घालण्याचा आपला हेतू नाही, असे त्यांनी लगेच स्पष्ट केले. एखाद्या ठिकाणी उभारले जाणाऱ्या उद्योगधंद्यांबद्दल नागरिकांना काही आक्षेप असेल तर त्यांनी तो वेळीच नोंदवणे आवश्यक आहे. एकदा हे उद्योगधंदे उभे राहिले की त्यास विरोध करणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.
केंद्रीय समितीने गोव्यातील खाणींवर नकारात्मक अहवाल दिल्यानंतर न्यायालयाने या खाणकामांवर तूर्तास बंदी घातली आहे.      

Story img Loader