कोळसा खाण वाटप गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेसचे खासदार नवीन जिंदाल आणि माजी कोळसा राज्यमंत्री दासरी नारायण राव यांच्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाकडून(सीबीआय) प्राथमिक माहिती अहवाल(एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज मंगळवार दाखल केलेल्या गुन्ह्यात जिंदाल यांच्या ‘जिंदाल पॉवर अँड स्टील लिमिटेड’सह इतर दोन कंपन्यांचा समावेश आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिल्ली, हैदराबाद या शहरांमध्ये पंधरा ठिकाणी कोळसा खाण वाटप गैरव्यवहारप्रकरणी आज छापे टाकले.
‘नलवा स्पॉज’ आणि ‘गगन स्पॉज’ या दोन कंपन्यांशी जिंदाल निगडीत आहेत. या कंपन्या सीबीआयच्या रडावर होत्या. या दोन्ही कंपन्यांना छत्तीसगडयेथे २००६ साली प्रत्येकी एक कोळसा खाणवाटप करण्यात आले होते आणि या खाणींमध्ये खाणकाम जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनी संयुक्त उद्यमाने हाताळते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा