आदित्य बिर्ला उद्योगसमूहातील हिंदाल्को कंपनीला कोळसा खाणीचे वाटप करण्यासंदर्भातील सर्व कागदपत्रे देण्याची मागणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पंतप्रधान कार्यालयाकडे केली. पंतप्रधानांसमोर दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांवर गुणवत्तेच्या आधारे हिंदाल्कोला कोळसा खाणी वाटण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असे पंतप्रधान कार्यालयातील उच्चस्तरिय अधिकाऱयांनी तीन दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यानंतर लगेचच पंतप्रधान कार्यालयाकडे या कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. 
कोळसा खाण घोटाळाप्रकरणी सीबीआयने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात नव्याने स्थितीदर्शक अहवाल सादर केला. हा अहवाल सादर करण्यात आल्यानंतरच पंतप्रधान कार्यालयाकडे कागदपत्रे देण्याची मागणी करण्यात आल्याचे सीबीआयमधील सूत्रांनी सांगितले. या घोटाळ्याप्रकरणी आदित्य बिर्ला उद्योगसमूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव पी. सी. पारख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहितीही न्यायलयाला देण्यात आली.
तालाबिरामधील कोळसा खाण हिंदाल्कोला देण्याचा निर्णय़ योग्यच असल्याचे पंतप्रधान कार्यालयने म्हटले आहे, अशीही माहिती यावेळी न्यायालयाला देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coal scam cbi seeks hindalco files from prime ministers office
Show comments