मुक्त आर्थिक धोरणाच्या अंमलबजावणीनंतर खासगी क्षेत्रास कोळशाच्या खाणींचे वाटप कोणत्या धोरणाखाली करण्यात आले तसेच त्यासाठी कोणती मार्गदर्शक तत्त्वे अमलात आणण्यात आली, त्यासंबंधी स्पष्टीकरण देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले.
साधारण १९९३ नंतर खासगी क्षेत्रास कोळशाच्या खाणींचे वाटप करण्याचा निर्णय अमलात आला. हा कालावधी तसेच २००६ ते २००८ दरम्यान खासगी क्षेत्रातील ज्या कंपन्यांना कोळशाच्या खाणींचे वाटप करण्यात आले आहे, त्यांच्याशी संबंधित प्रत्येक कंपनीच्या व्यवहाराचा तपास करण्याचा निर्णय केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने घेतला आहे. या सर्व कंपन्यांना प्रदान करण्यात आलेल्या खाणींचे वाटप रद्द करण्यात यावे, अशी विनंती करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये करण्यात आली आहे. त्यावरील सुनावणीप्रसंगी खंडपीठाचे न्या. आर. एम. लोढा यांनी केंद्र सरकारला हा आदेश दिला.
कोळसा खाणीवाटपाचे धोरण आणि मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट करा
मुक्त आर्थिक धोरणाच्या अंमलबजावणीनंतर खासगी क्षेत्रास कोळशाच्या खाणींचे वाटप कोणत्या धोरणाखाली करण्यात आले तसेच त्यासाठी कोणती मार्गदर्शक तत्त्वे अमलात आणण्यात आली,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-09-2013 at 01:39 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coal scam sc seeks clarification from centre on policy guidelines