कोळसा घोटाळा (कोलगेट) प्रकरणी वकील प्रशांत भूषण यांनी केलेल्या वक्तव्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज त्यांच्यावर ताशेरे ओढले असून नंतर त्यांनी मागितलेली माफी स्वीकारली आहे. कोळसा घोटाळा प्रकरणी सुनावणीच्या वेळी त्यांनी न्यायपीठाबाबत आक्षेपार्ह व अस्वस्थ करणारे वक्तव्य केले होते.
न्या.आर.एम.लोढा यांनी  हे प्रकरण केवळ प्रशांत भूषण यांनी एका नियतकालिकात केलेल्या वक्तव्याची दखल घेण्याच्या दृष्टिकोनातून पटलावर घेतले होते. न्या, मदन बी.लोकूर व कुरियन जोसेफ यांचाही या प्रकरणी सुनावणी करणाऱ्या न्यायपीठात समावेश असून त्यांनी भूषण यांच्यावर त्यांनी माफी मागितल्यानंतर आणखी  कारवाई करण्याचे नाकारले.

Story img Loader