समुद्रात आपली टेहळणी व शोध क्षमता वाढवण्यासाठी २०२० सालापर्यंत आपल्या ताफ्यात आणखी ३८ विमाने व हेलिकॉप्टर्स यांचा समावेश करण्याचे तटरक्षक दलाने ठरवले आहे.
तटरक्षक दलाच्या प्रस्तावित विस्तार योजनेनुसार, या सागरी सुरक्षा दलाला प्रगत हलकी हेलिकॉप्टर्स, दुहेरी इंजिनांची विमाने आणि समुद्रावरील बहुउपयोगी टेहळणी विमाने मिळणार आहेत. तटरक्षक दलाजवळ आजमितीला ६२ विमाने व हेलिकॉप्टर्सचा ताफा आहे.
१६ प्रगत हलकी विमाने (अॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर्स) मिळवण्यासाठी तटरक्षक दल येत्या तीन-चार महिन्यांत हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लि. (एचएएल) सोबत करार करणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
याशिवाय दुहेरी इंजिनांची १४ जड हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याचा पर्यायही पडताळून पाहण्यात येत आहे. ‘एअरबस हेलिॉप्टर्स’देखील आपल्या ताफ्यात असावीत असा दलाचा प्रयत्न असला, तरी यााबतचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे प्रलंबित असल्यामुळे त्यासाठी काही वर्षे लागू शकतील.
समुद्रात लांबवर जाऊ शकतील अशी दोन इंजिनांची विमाने घेण्याचा आमचा विचार सुरू आहे. सध्याच्या चेतक हेलिकॉप्टर्सची तशा प्रकारची क्षमता नाही.
दोन इंजिनांची विमाने ज्या ठिकाणी धावपट्टय़ा नाहीत, अशा मिनिकॉयसारख्या ठिकाणी उपयोगी ठरतील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
तटरक्षक दलासाठी आणखी ३८ विमाने २०२० सालापर्यंत समावेश करणार
याशिवाय दुहेरी इंजिनांची १४ जड हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याचा पर्यायही पडताळून पाहण्यात येत आहे.
First published on: 09-02-2016 at 02:45 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coast guard to induct 38 more aircraft by