AI Startup Gives Rs 14 Crore Bonus To Employees : देशाच सध्या अनेक नवीन स्टार्टअप्स सुरू होताना दिसत आहेत. पण यापैकी खूप कमी स्टार्टअप यशस्वी होताता. तमिळनाडूतील कोईम्बतूर येथील येथील एका स्टार्टअपने अनेकांचं स्वप्न असतं ते करून दाखवलं आहे. कोवाई.को हे एक असं स्टार्टअप आहे बिझनेस-टू-बिझनेस SaaS सोल्यूशन्स पुरवते. हे स्टार्टअप सरवणकुमार यांनी २०११ मध्ये सुरू केले होते. स्थापनेच्या चौदा वर्षांनंतर सरवणकुमार यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करत त्यांच्या १४० कर्मचाऱ्यांना १४ कोटी रुपये बोनस दिला आहे.

या स्टार्टअपचे संस्थापक सरवणकुमार हे मुळचे कोईम्बतूरचे आहेत या शहराला कोवाई असेही म्हटले जातो. कोईम्बतूर या शहराच्या नावावरूनच त्यांनी स्टार्टअप कंपनीचे नाव ठेवण्यात आले आहे. २५ वर्षांपूर्वी सरवणकुमार हे लंडनला निघून गेले होते.

“मी दहा वर्षांपेक्षा जास्त काळ एक रेग्युलर आयटीमध्ये नोकरी करणारा व्यक्ती होतो, पण मला मार्केटमध्ये एक संधी दिसली आणि मी हे स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला. हे पूर्णपणे बूटस्ट्रॅप्ड (bootstrapped) आहे आणि आम्ही बाहेरून कोणतीही फंडिंग घेतलेली नाही,” असे त्यांनी एनडीटीव्ही प्रॉफिटशी बोलताना सांगितले.

Kovai.co हे स्टार्टअप सध्या वर्षाला १५ दशलक्ष डॉलर्सचे उत्पन्न मिळवत आहे आणि सध्या याची मूल्य १०० दशलक्ष डॉलर इतकं असल्याचे सरवणकुमार यांनी सांगितले. त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेले वचन पूर्ण केलं आणि १४० कर्मचाऱ्यांना १४ कोटींचा बोनस दिला.

Kovai.co या कंपनीचे ४८ वर्षीय सीईओ हे बहुतांश वेळ लंडनमध्ये राहतात आणि त्यांचे २५० कर्मचारी हे कोईम्बतूर येथून काम करतात. २०३० पर्यंत कंपनीचे उत्पन्न १०० दशलक्ष डॉलरवर घेऊन जाण्याचं आपलं स्वप्न असून त्या गोष्टी त्या दिशेने जात आहेत, असे सीईओ म्हणाले.

Story img Loader