काश्मीरच्या खोऱ्यातील कडाक्याच्या थंडीचा ४० दिवसांचा काळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘चिल्लाई- कलन’ला शनिवारी सकाळपासून सुरुवात झाली़  हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता येथील उंच भागांमध्ये हिमवृष्टीलाही सुरुवात होणार आह़े
शनिवारी संध्याकाळपासूनच येथील गुलमर्ग, सोनमर्ग, शोपियन, कुपवारा आणि पहलगाम या भागांत हलकी ते मध्यम हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे, असे येथील हवामान विभागाच्या संचालिका सोनम लोटस यांनी सांगितल़े श्रीनगरमध्ये शनिवारी उणे ३.९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली़  आदल्या रात्री हे तापमान उणे ३ अंश होत़े  याच रात्री गुलमर्ग येथील स्क्री रिसॉर्ट येथे सर्वात कमी म्हणजे उण्या ७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली़  तर काश्मीरच्या खोऱ्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या क्वाझीगुंड भागात शुक्रवारी रात्री उणे ४.८ सेल्सियस तापमान होत़े  तर याच भागात शनिवारी पार उणे ३.२ अंश सेल्सियसपर्यंत खाली गेला़
लेह येथील सर्वात थंड भाग ठरला़  लेहमधील तापमान उणे १२.४ अंश सेल्सियसपर्यंत खाली गेले होत़े  तेथून जवळच्याच कारगीलमध्ये शुक्रवारी रात्री तापमान उणे ११.२ अंश होत़े
‘चिल्लाई- कलन’च्या काळात हिमवृष्टीची शक्यता सर्वाधिक आणि वारंवार असत़े  याच काळात गुलमर्गमधील स्क्रीईंग रिसॉर्ट येथे विविध हिवाळी खेळांचे आयोजन करण्यात येत़े  या वर्षी थंड वारे नेहमीपेक्षा लवकर काश्मीरच्या खोऱ्यात शिरल़े  त्यामुळे ‘चिल्लाई- कलन’चा काळ सुरू होण्याआधीच ऑक्टोबरमध्ये गुलमर्ग भागात पहिली हिमवृष्टी झाली होती़  शनिवारी सुरू झालेला ‘चिल्लाई- कलन’चा काळ ३१ जानेवारीपर्यंत चालेल़  त्यानंतर २० दिवसांचा ‘चिल्लाई- खुर्द’ हा कमी थंडीचा काळ सुरू होईल़

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा