पीटीआय, श्रीनगर/जयपूर
काश्मीरच्या मैदानी भागात झालेल्या हिमवृष्टीनंतर खोऱ्यातील किमान तापमानात शुक्रवारी घसरण झाली. त्यामुळे पुढील चार दिवसांत अनेक भागांत थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

शोपियान, पुलवामा आणि बारामुल्ला येथील मैदानी भागात तसेच अनंतनाग, बडगाम आणि बांदीपोरा येथील वरच्या भागातही हलकी बर्फवृष्टी झाली. हवामान खात्याने २१ डिसेंबरपर्यंत मुख्यत: कोरडे हवामान राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

हेही वाचा : Allu Arjun : संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी कशी झाली? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम; म्हणाले, “अल्लू अर्जूनने हातवारे…”

राजस्थानमध्येही थंडीची लाट कायम असून फतेहपूरमध्ये हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात काही भागात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट दिसून आली. उत्तर राजस्थान आणि शेखावती प्रदेशात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याचा अंदाज असून किमान तापमान दोन ते सहा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

Story img Loader