काश्मीरमध्ये अतिशय तीव्र थंडीचा ४० दिवसांचा काळ संपत आला असून, त्याला ‘चिलाई कलान’ असे स्थानिक भाषेत म्हटले जाते. रात्रीचे तापमान खूप कमी असून, लडाख या सीमेवरील भागासह खोऱ्यात अनेक ठिकाणी तापमान गोठणबिंदूच्या खाली गेला आहे. दरम्यान, श्रीनगर व इतर काही ठिकाणी रात्रीच्या वेळी हाडे गोठवणारी थंडी होती. रविवारी सकाळी काही ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश होता. दक्षिण काश्मीरमध्ये पहलगाम येथे अमरनाथ यात्रेच्या बेस कॅम्पला रात्रीचे तापमान उणे ११.२ अंश सेल्सिअस होते, असे हवामान प्रवक्त्याने सांगितले. हवामान प्रवक्ते लडाखमधील कारगिल येथे उणे १७ अंश सेल्सिअस तापमान होते. श्रीनगरसह अनेक ठिकाणी हिमवृष्टी झाली. पठारी प्रदेशात प्रथमच हिमवृष्टी झाली असली तरी उंचावरील ठिकाणी सहा वेळा हिमवृष्टी झाली आहे. श्रीनगर येथे ९.३ अंश सेल्सिअस तापमान होते व हवामान सूर्यप्रकाशित होते, तेथे रात्रीचे तापमान उणे ३.५ अंश सेल्सिअस होते.
उत्तर काश्मीरमधील गुलमर्ग येथे पर्यटक येत असतात. विशेष म्हणजे तेथे बर्फावर स्कीइंग केले जाते. तेथे परदेशातून लोक येतात. तेथील रात्रीचे तापमान उणे ९.६ अंश सेल्सिअस होते. गुलमर्ग येथे १८ जानेवारीला रात्री १०.६ अंश सेल्सिअस तापमान होते. लडाखमधील लेह येथे उणे १६.७८ तर कोकेरनाग या दक्षिण काश्मीरमधील ठिकाणी उणे ४.५ अंश सेल्सिअस तापमान होते. कुपवाडाची सीमा व काझीगुंड येथे उणे ३.२ अंश सेल्सिअस होते. ‘चिलाई कलान’चा काळ २१ डिसेंबरपासून सुरू होतो व तो उद्या संपत आहे. त्यानंतरही ४० दिवस थंडी राहते. त्याला ‘चिलाई खुर्द’ म्हणजे कमी थंडी असे म्हटले जाते. नंतरचे दहा दिवस थंडी आणखी कमी होते त्याला ‘चिलाई बच्चा’ असे म्हटले जाते.

Story img Loader