Chennai Anna University News: महिला सुरक्षा, महिला सबलीकरण किंवा महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणासारख्या अनेक चर्चा, निर्णय आणि मोहिमा राबवल्यानंतरदेखील महिलांची सुरक्षा करण्यात सर्वच राज्यांमधील प्रशासन, नेतेमंडळी व शासनकर्ते यांना अपयश आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. एकीकडे महाराष्ट्रात कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या धक्कादायक प्रकाराने खळबळ उडालेली असतानाच दुसरीकडे चेन्नईमध्ये रस्त्यावर बिर्याणी विकणाऱ्या ठेलेवाल्यानं कॉलेज कॅम्पसमध्ये शिरून एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. भाजपा व अण्णाद्रमुक पक्षाकडून आरोपीचा सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्या रात्री नेमकं घडलं काय?
ही दुर्दैवी घटना सोमवारी संध्याकाळी ८ च्या सुमारास घडली. चेन्नईमधील प्रसिद्ध अण्णा युनिव्हर्सिटीच्या आवारात हा सगळा प्रकार घडल्यानंतर विद्यापीठाबरोबरच चेन्नई शहरात खळबळ उडाली आहे. आयआयटी मद्रास आणि थेट उच्च सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या राज भवनापासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे महिलांची सुरक्षा आणि शहरातील सुरक्षा व्यवस्था या दोन्ही बाबी ऐरणीवर आल्या आहेत.
सोमवारी संध्याकाळी ८ च्या सुमारास पीडित विद्यार्थिनी तिच्या मित्रासमवेत कॉलेज कॅम्पसमध्ये बोलत उभी असताना ज्ञानशेखरन नावाच्या आरोपीने त्या दोघांचा व्हिडीओ शूट केला. युनिव्हर्सिटी कॅम्पसपासून जवळच ज्ञानशेखरनचा बिर्याणी विकण्याचा व्यवसाय आहे. व्हिडीओ शूट केल्यानंतर ज्ञानशेखरननं त्या दोघांना धमकावायला सुरुवात केली. आपण व्हिडीओ व्हायरल करू, असं सांगून त्यानं तरुणीच्या मित्राला तिथून निघून जायला सांगितलं. त्यानंतर त्यानं तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे यानंतर त्यानं तरुणीचा मोबाईल क्रमांक घेतला आणि आपण बोलवू तेव्हा भेटायला यावं लागेल, अशी धमकीही दिली.
तरुणीनं हिंमत दाखवली, गुन्हेगाराला अटक झाली!
दरम्यान, दुसऱ्या दिवशी तरुणीनं आरोपीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. तसेच, विद्यापीठ सुरक्षा समितीकडेही तक्रार केली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर आरोपी ज्ञानशेखरनच असल्याची पोलिसांची खात्री पटली. बुधवारी आरोपीला अटक करण्यात आली. त्याचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यात त्यानं पीडित तरुणी व तिच्या मित्राचा बोलतानाचा शूट केलेला व्हिडीओ पोलिसांना सापडला आहे. याआधीही आरोपीनं अशा प्रकारे कुणाचे व्हिडीओ शूट करून ते डिलिट केलेत का? याचा पोलीस सध्या तपास करत आहेत.
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक
“मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी कायदा आणि सुव्यवस्थेची एवढी वाईट अवस्था करून ठेवली आहे. जेव्हा केव्हा मी राज्यातल्या कायदा व सुव्यवस्थेची दुरावस्था झाल्याचा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा राज्य सरकारचा कल फक्त माझ्या दाव्यांना विरोध करण्याचाच होता. जर मुख्यमंत्र्यांनी वेळीच माझ्या मुद्द्यांची दखल घेऊन कृती केली असती, तर आपण या अशा घटना टाळू शकलो असतो”, अशी टीका अण्णाद्रमुक पक्षाचे सरचिटणीस इडाप्पडी के पलानीस्वामी यांनी केली आहे.
सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना दाबण्यासाठी पोलीस बळाचा वापर – भारतीय जनता पक्ष
भ
“द्रमुकच्या सत्ताकाळात तामिळनाडू म्हणजे बेकायदेशीर कारवायांसाठी आण गुन्हेगारांसाठी नंदनवन ठरलं आहे. राज्यात आता महिलांना सुरक्षित वाटत नाही. कारण सत्ताधाऱ्यांनी सर्व पोलिसांना विरोधकांना शांत ठेवण्यात व्यग्र करून टाकलं आहे”, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांनी टीका केली आहे.