कंबोडियाचे माजी राजे नोरोदोम सिहॅनॉक यांचे सोमवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. तब्येतीवरील उपचार सुरू असल्यामुळे गेली अनेक वर्षे त्यांचे चीनमध्येच वास्तव्य होते. ३१ ऑक्टोबर १९२२ रोजी जन्मलेल्या नोरोदोम सिहॅनॉक यांनी १९४१ ते १९५५ या काळात  तसेच १९९३ पासून ७ ऑक्टोबर २००४ रोजी स्वेच्छेने पायउतार होईपर्यंत कंबोडियाचे राजेपद भूषविले होते. आपल्या कारकीर्दीत त्यांनी अनेक मानाची पदे भूषविली होती. यामध्ये राष्ट्राध्यक्षपद, पंतप्रधानपद आणि राजेपदाचा समावेश होता. फ्रान्सने कंबोडियाला स्वतंत्र म्हणून घोषित केल्यानंतर सिहॅनॉक यांनी अत्यंत प्रभावीपणे कार्यभार सांभाळला. त्यामुळेच त्यांना स्वातंत्र्याचे-राष्ट्रीय ऐक्याचे आणि ख्मेर क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते.   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Combodia king dead