* ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यासाठी कठोर नियम
* पारदर्शक आणि तोकडय़ा कपडय़ांना बंदी
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Already have an account? Sign in
* ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यासाठी कठोर नियम
* पारदर्शक आणि तोकडय़ा कपडय़ांना बंदी
‘.. अँड ग्रॅमी अॅवॉर्डस् गोज टू..’, जिंकणाऱ्याचं नाव घोषित होताच तोंडावर आश्चर्यमिश्रित भावनांचे आणि अंगांगाचे प्रदर्शन करत कॅमेरासमोर येणाऱ्यांना यंदा ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात सोवळ्यानेच यावे लागणार आहे. तसा कडक नियमच घालून देण्यात आला आहे.
ऑस्करच्या तोडीचा आणि संगीतविश्वातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा ग्रॅमी पुरस्कार सोहळा दरवर्षी ऑस्करच्या आधी पार पडतो. यंदा हा सोहळा रविवारी, १० फेब्रुवारीला होणार आहे. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या सीबीएस या प्रतिष्ठित प्रसारण सेवेने सोहळ्यासाठी येणाऱ्या सेलिब्रिटींना कपडय़ांबाबत नियमच आखून दिले आहेत. अंगप्रत्यांगाचे प्रदर्शन करण्यावर बंदी घालण्यात आली असून अंगभर कपडे घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नियमावली अशी
* पारदर्शक कपडय़ांना बंदी
* तोकडय़ा कपडय़ांना मनाईच
* कपडय़ांवर कोणत्याही उत्पादनाची जाहिरात नसावी
* परदेशी भाषेतील घोषवाक्य कपडय़ांवर असल्यास आयोजकांची पूर्वसंमती घेतलेली असावी
* सेलिब्रिटी आणि प्रेक्षक दोघांनाही नियम लागू