सुप्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. त्यांना एम्समध्ये व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा – मंत्रीपद मिळताच संजय राठोड यांचा चित्रा वाघ यांना इशारा; म्हणाले “मी आतापर्यंत शांत होतो, पण आता…”

राजू श्रीवास्तव हे जीममध्ये ट्रेडमिलवर धावत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या छातीत दुखू लागल्यानंतर ते अचानक खाली पडले. यानंतर त्यांना जीम ट्रेनरने तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांची अँजिओग्राफी करण्यात आली असून त्यात १०० टक्के ब्लॉक आढळले आहेत. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

हेही वाचा – “…म्हणून संजय राठोड यांना मंत्रीपद दिले”; दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण

राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध विनोदी कलाकार आहेत. ते अनेक लोकप्रिय टीव्ही शोचा भाग राहिले आहेत. त्यांची गणना देशातील सर्वोत्कृष्ट हास्यकलाकारांमध्ये केली जाते. राजू श्रीवास्तव ‘बिग बॉस’, ‘शक्तिमान’, ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’, ‘कॉमेडी सर्कस’ आणि ‘द कपिल शर्मा शो’चा हिस्साही राहिले आहेत. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांचे चाहते ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे.

Story img Loader