LPG Cylinder Price Hike: वर्षाच्या शेवटच्या महिन्यात महागाईचा जोरदार झटका बसला आहे. तेल वितरक कंपन्यांनी डिसेंबरच्या पहिल्या तारखेलाच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे. देशभरात आजपासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात १६.५ रुपयांची वाढ केली आहे. त्याचवेळी १४ किलोच्या घरगुती वापराच्या सिलिंडरमध्ये मात्र कोणतीही वाढ केलेली नाही. ही सामान्य जनतेसाठी तेवढी दिलासादायक बातमी आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मागच्या महिन्यातच दरवाढ करण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाढलेल्या दरानुसार दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आता १८१८.५० रुपयांना मिळणार आहे. याआधी त्याची किंमत १८०२ एवढी होती. तर मुंबईमध्येही सिलिंडरच्या दरात वाढ झाले आहे. कालपर्यंत १७५४.५० रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर आता १७७१ रुपयांना मिळणार आहे. तर चेन्नईमध्ये १९८०.५० आणि कोलकातामध्ये १९२७ रुपयांमध्ये व्यावसायिक सिलिंडर मिळणार आहे.

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याचा थेट परिणाम रेस्टॉरंट, हॉटेल आणि ज्या कारखान्यांना अशा सिलिंडरची गरज असते, त्यांच्यावर थेट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हॉटेलमधील पदार्थ, काही उत्पादनांचा दर वाढून सरतेशेवटी सामान्य माणसाच्याच खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commercial lpg cylinder prices hiked by rs 16 5 domestic remained unchanged kvg