नवी दिल्ली : देशभर समान नागरी कायदा लागू करण्याची घाई न करता विविध धर्मातील वैयक्तिक कायदे, जमातींच्या प्रथा-परंपरा-नियम यांचा सखोल अभ्यास केला पाहिजे, अशी भूमिका बहुसंख्य भाजपेतर पक्षांनी सोमवारी संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत घेतल्याचे समजते. संसदेच्या विधि व न्याय, तक्रार निवारण आणि कार्मिक विषयक स्थायी समितीची बैठक सोमवारी झाली. यावेळी विधि आयोगाच्या वतीने समान नागरी संहितेसंदर्भात सादरीकरण झाले.

बैठकीत वैयक्तिक कायद्यातील सुधारणांसंदर्भात प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. विविध धर्माचे कायदे, लग्नासंदर्भातील तरतुदी, दत्तकविषयक नियम, संमतीवय अशा मुद्दय़ांसंदर्भात आयोगाकडून सदस्यांनी माहिती घेतली. समान नागरी कायद्याला आम आदमी पक्ष (आप) तसेच, बहुजन समाज पक्षाने तत्त्वत: पाठिंबा दिला आहे. आता मात्र, सर्व धर्माशी व जमातींशी चर्चा केल्याशिवाय सरकारने निर्णय घेऊ नये, अशी भूमिका या दोन्ही पक्षांनी घेतली आहे. काँग्रेसने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. समान नागरी संहितेवर केंद्र सरकारने मसुदा तयार केल्यानंतर विरोध करायचा की, पाठिंबा द्यायचा हे ठरवले जाईल, असे काँग्रेसचे माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश यांनी सांगितले. केंद्र सरकारने घाईघाईने निर्णय घेऊ नये, सखोल चर्चा झाली पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने स्पष्ट केले आहे. विधि आयोगाच्या सादरीकरणाचा अभ्यास केल्यानंतर स्थायी समितीची पुन्हा बैठक होणार असून त्यावेळी सदस्यांकडून सविस्तर मते मांडली जाऊ शकतात.

Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
Vidhan Bhavan premises Central Vista vidhan
विधानभवन परिसराचा कायापालट, अध्यक्षपदी फेरनिवड होताच राहुल नार्वेकर यांचा पुनरुच्चार; सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर विकास
massive agitation organised against mla bhaskar jadhav in vikas jadhav attack case
हल्ल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव आक्रमक, आमदार भास्कर जाधवांविरोधात विराट मोर्च्याचे आयोजन
Congress Shiv Sena Thackeray faction leaders meet Chief Minister for opposition demand for Assembly Deputy Speaker Leader of Opposition post Print politics news
विधानसभा उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेतेपदाची विरोधकांची मागणी; मुख्यमंत्र्यांची भेट

आतापर्यंत सुमारे ९ लाख सूचना विधि आयोगाकडे आल्याचे समजते. विविध धर्मातील वैयक्तिक कायदे व तरतुदींसंदर्भात विधि आयोगाकडून समितीच्या सदस्यांना माहिती देण्यात आली. समितीचे अध्यक्ष व भाजपचे राज्यसभेतील खासदार सुशीलकुमार मोदी यांनी विविध धर्माअंतर्गत वैयक्तिक कायद्यांसंदर्भात विधि आयोगाची मते जाणून घेतली जातील, अशी माहिती बैठकीपूर्वी दिली होती.

विधेयक हिवाळी अधिवेशनात?

विधि आयोगाने सूचना सादर करण्याची मुदत १३ जुलै रोजी संपत आहे. या सूचनांचा विचार करून आयोग केंद्र सरकारला अहवाल सादर केला जाईल, त्यासाठी किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागू शकतो असे आयोगाच्या वतीने बैठकीत स्पष्ट केल्याचे समजते. त्यामुळे समान नागरी संहितेचे विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मांडले जाण्याची शक्यता आहे.

Story img Loader