ओमायक्रॉनची वाढती रुग्णसंख्या, त्याची लक्षणं या पार्श्वभूमीवर साधी सर्दी झाली तरी चिंता वाटणाऱ्यांसाठी एक दिलासादायक वृत्त आहे. सामान्यपणे सर्वसामान्य सर्दी होण्यासाठीही करोना विषाणूंच्या प्रजातींपैकीच काही सौम्य क्षमतेचे विषाणू कारणीभूत असतात. अशा सर्वसामान्य सर्दीला प्रतिकार करण्यासाठी शरीरामध्ये निर्माण होणारे टी सेल्स हे कोव्हिड-१९ च्या विषाणूचा संसर्गचा धोका कमी करतात. सामान्यपणे सर्दीचा त्रास असणाऱ्यांना सार्क-सीओव्ही २ चा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते, असं ब्रिटनमधील एका संशोधनामधून समोर आलं आहे. भारतीय वंशाच्या संशोधकांनी ब्रिटनमध्ये केलेल्या संशोधनामधून ही माहिती समोर आलीय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘नेचर कम्युनिकेशन्स’ नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनामध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार टी सेल्समुळे निर्माण होणारी रोगप्रतिकारशक्तीचा पुरावा पहिल्यांदाच मिळाल्याचा दावा करण्यात येतोय. हे संशोधन लंडनमधील इम्पिरियल कॉलेजच्या संशोधकांनी केलंय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: ‘या’ देशांमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळला नाही; यादीतील शेवटचे दोन देश पाहून आश्चर्य वाटेल

यापूर्वी करण्यात आलेल्या संशोधनामध्ये करोना उपप्रकारामधील (करोना व्हायरस टाइप) विषाणूंच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या टी सेल्समुळे घातक ठरणाऱ्या कोव्हिड-१९ चा संसर्ग होण्यासाठी कारणीभूत असलेल्या सीर्स-सीओव्ही-२ या विषाणूला प्रतिरोध करण्याची क्षमता निर्माण होते. नवीन संशोधनामध्ये या टी सेल्समुळे कशाप्रकारे सार्स-सीओव्ही -२ चा संसर्ग न होता संरक्षण मिळतं हे दिसून आलं असून त्याची संपूर्ण प्रक्रिया सांगण्यात आलीय. करोना हा विषाणूंचा एक प्रकार असून या विषाणूंपैकी सार्क-सीओव्ही २ प्रकारच्या ठराविक विषाणूचा संसर्ग झाल्यास करोनाचा संसर्ग झाला असं म्हटलं जातं, ही गोष्ट येथे लक्षात घेणे गरजेचे आहे.

नक्की वाचा >> करोना संसर्ग व्हावा म्हणून तरुणीची धडपड; क्लबमध्ये अनोळखी लोकांना मिठ्या मारुन बाधित होण्याचे प्रयत्न सुरु

करोना विषाणूंपैकी काही विषाणू हे फार सौम्य असतात. यापैकीच काही ठराविक विषाणूंचा संसर्ग झाल्यास सामान्य प्रकारची सर्दी आणि इतर तत्सम त्रास होतात. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, संशोधकांचं असं म्हणणं आहे की सामान्य सर्दीसाठी कारणीभूत असणाऱ्या विषाणूंमुळे शरीरामध्ये निर्माण होणारी रोगप्रतिकारशक्ती ही करोनाचा संसर्ग रोखण्यास मदत करु शकते.

या संशोधनाचा फायदा पुढे करोना प्रतिबंधक लसींच्या निर्मितीसाठी होईल असा विश्वास संशोधकांना आहे. या नवीन लसी सध्या थैमान घालणाऱ्या करोनाच्या विषाणूबरोबरच भविष्यामधील या विषाणूच्या व्हेरिएंटपासूनही संरक्षण देऊ शकतील असं संशोधकांचं म्हणणं आहे.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: एवढ्या वेगाने Omicron का पसरतोय? लक्षणं किती दिवसांनी दिसतात? रुग्ण किती दिवसात बरा होतो?

लंडनमधील इम्पिरियल कॉलेजमधील नॅशनल इन्स्टीट्यूट फॉर हेल्थ रिसर्चचे निर्देशक प्राध्यापक अजित लालवानी यांनी यासंदर्भातील माहिती दिली. “सामान्य सर्दीसाठी कारणीभूत असणाऱ्या करोना विषाणूंमुळे निर्माण होणारे टी सेल्स हे सार्स-सीओव्ही-२ चा संसर्गापासून संरक्षण देतात याचे पुरावे सापडलेत,” असं लालवानी यांनी सांगितलंय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Common cold t cells may offer protection against covid 19 uk study scsg