* दोन गटांत चकमक * बेमुदत संचारबंदी जारी
श्रीडुंगरगड येथे एका धार्मिक मिरवणुकीदरम्यान दोन समाजातील गटांत चकमक उडाल्याने प्रशासनाने या परिसरात बेमुदत संचारबंदी जारी केली आहे.
मिरवणुकीदरम्यान दोन समाजात खटका उडाला तेव्हा एकमेकांवर करण्यात आलेल्या तुफान दगडफेकीत दोन पोलिसांसह तीन जण जखमी झाले, असे जिल्हाधिकारी पूनम यांनी सांगितले.
गुसाईसर गावांतून काढण्यात आलेली धार्मिक मिरवणूक दुसऱ्या समाजाच्या प्रार्थनास्थळाजवळून जात असताना ही चकमक उडाली. प्रार्थनास्थळातील भाविकांनी मिरवणुकीत वाजविण्यात येणारे संगीत बंद करण्यास सांगितले, मात्र त्याला मिरवणुकीतील लोकांनी नकार दिला तेव्हा त्यांच्यात खटका उडाला. यावरून दोन गटांत चकमक झडली आणि जमावाने दोन दुकानांना आगी लावल्या असता प्रशासनाने अतिरिक्त कुमक बोलाविली आणि परिसरात बेमुदत संचारबंदी जारी केली. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक केली असून, स्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणाखाली असल्याचा दावा पोलिसांनी केला.

Story img Loader