मध्य प्रदेशातील रतलाममध्ये गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर काही अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या दगडफेकीत काही लोक जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल असून शहरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रतलामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

शनिवारी रात्री घडला प्रकार

इंडियन एक्सप्रेसने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी रात्री हा प्रकार घडला. शहरातील मोचीपुरा भागातून गणपतीची मिरवणूक जात असताना अज्ञातांनी अचानक दगडफेक सुरू केली. या घटनेनंतर आरोपींना पकडण्याची मागणी करण्यासाठी नागरिकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. महत्त्वाचे म्हणजे पोलीस घटनास्थळी दाखल होताच त्यांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. यात पोलिसांच्या गाडीच्या काचाही फुटल्या.

Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?
shilphata road cash 5 crore rupees seized
कल्याण ग्रामीणमधील विधानसभा मतदारसंघात शिळफाटा येथे वाहनातून पाच कोटी जप्त
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
konkan hapus mango season likely to deley due to prolonged monsoon
लोकशिवार: लांबलेल्या पावसाने ‘आंबा’ही लांबवला
loksatta satire article sujay vikhe patil
उलटा चष्म: पातेले कलंडलेच..

हेही वाचा – Supreme Court : “आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवणे कायद्याविरोधात”, सर्वोच्च न्यायालयाचे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान सरकारवर ताशेरे

महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैन्यात

यासंदर्भात बोलताना पोलीस अधिक्षक म्हणाले, रतलामध्ये सध्या परिस्थिती नियंत्रणात असून येथे तणावपूर्ण शांतता आहे. या दगडफेकीच्या घटनेत काही लोक जखमी झाले आहेत. त्यांना उपाचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दगडफेकीमुळे गणपतीच्या मुर्तीचं कोणतेही नुकसान झालेलं नाही. सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैन्यात केला आहे. पुढे बोलाताना, याप्रकरणी काही अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.