‘अब की बार मोदी सरकार’ भाजपच्या या घोषणेविरुद्ध अभिनव यादव नावाच्या एका तरुणाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
मोदी ही गुजरातमधली एक जात असून भाजपच्या या घोषवाक्यातून फक्त त्या जातीचा प्रचार होत असल्याचा आक्षेप या तरुणाने घेतला आहे. अभिनवने या घोष वाक्याविरोधात निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार नोंदवली आहे.
भारत एक धर्मनिरपेक्ष देश असून, जाहीरातीतील या घोषवाक्यामुळे जातीच्या राजकरणाला प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे या घोषवाक्यावर बंदी आणण्याची मागणी अभिनवने निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगाने अभिनवच्या तक्रारीची दखल घेतली असून, त्याने नोंदवलेल्या आक्षेपांचा तपास सुरु केला आहे.
‘अब की बार मोदी सरकार’विरुद्ध तक्रार
'अब की बार मोदी सरकार' भाजपच्या या घोषणेविरुद्ध अभिनव यादव नावाच्या एका तरुणाने निवडणूक आयोगाचे दरवाजे ठोठावले आहेत.
First published on: 05-04-2014 at 05:15 IST
TOPICSनरेंद्र मोदीNarendra Modiनिवडणूक आयोगElection Commissionनिवडणूक २०२४Electionभारतीय जनता पार्टीBJP
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Compaint against ab ki baar ki modi sarkar slogan