नवी दिल्ली : देशातील तीन सार्वजनिक पेट्रोलियम कंपन्यांनी दोन वर्षांमध्ये (जून २०२० ते जून २०२२) आंतरराष्ट्रीय किमतीपेक्षा कमी दरांमध्ये गॅस सिलिंडरची विक्री केली. तीन कंपन्यांचे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी एकरकमी २२ हजार कोटींचे अनुदान देण्याचा निर्णय बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतल्याची माहिती केंद्रीय माहिती-प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘एलपीजी’च्या किमती ३०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्या असल्या तरी, देशांतर्गत स्तरावर घरगुती गॅस सिलिंडरचे दर केवळ ७२ टक्क्यांनी वाढवण्यात आले. सामान्यजनांवर वाढत्या दरांचा बोजा पडू नये, यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या तीनही सार्वजनिक पेट्रोलियन कंपन्यांनी कमी दरात गॅस सिलिंडरची विक्री केली. त्यामुळे या कंपन्यांना एकरकमी अनुदान देणे गरजेचे होते, असे ठाकूर यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस

मोदी सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. ११.२७ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना १ हजार ८३२ कोटींचा उत्पादकतेशी निगडित बोनस दिला जाणार आहे. हा बोनस ७८ दिवसांचा असून सर्वाधिक १७ हजार ९५१ रुपयांचा बोनस मिळेल, अशी माहितीही ठाकूर यांनी दिली. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहामाहीत रेल्वे प्रवाशांच्या महसुलात ९२ टक्के वाढ झाली आहे. १ एप्रिल ते ८ ऑक्टोबर या कालावधीत रेल्वेने ३३ हजार ४७६ कोटींची कमाई केली आहे. २०२१ मध्ये याच कालावधीत १७ हजार ३९४ कोटींचा महसूल मिळाला होता. या वर्षी १ एप्रिल ते ८ ऑक्टोबर या सहा महिन्यांमध्ये ४२.८९ कोटी लोकांनी आरक्षित श्रेणींमध्ये प्रवास केला, गेल्या वर्षी याच कालावधीत ३४.५६ कोटी लोकांनी प्रवास केला होता. या प्रवासामध्ये २४ टक्क्यांची वाढ झाली आहे. २६ हजार ९६१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो (१६ हजार ३०७ कोटी) ६५ टक्के अधिक आहे, अशी माहिती देण्यात आली. 