धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांच्याविरुद्ध भोपाळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अभिनव चक्रधर यांनी तक्रार केल्यानंतर कुमार विश्वास यांच्याविरुद्ध टीटी नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
कुमार विश्वास यांनी आपल्या मुशायराच्या कार्यक्रमात सादर केलेल्या रचनांमधून हिंदू आणि मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप चक्रधर यांनी केला आहे. दरम्यान, या तक्रारीचा आणि कुमार विश्वास आम आदमी पक्षाचे नेते आहेत, याचा काहीही संबंध नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. राजकारण्यांचा आणि मान्यवरांची चेष्टामस्करी समजू शकते. मात्र, कुमार विश्वास यांनी मर्यादेचे उल्लंघन केले असून, धार्मिक भावना दुखावल्या आहेत, असेही तक्रारीत म्हटले आहे.

Story img Loader