केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी खोटी माहिती दिल्याच्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर दिल्ली न्यायालयाने निकाल २४ जूनपर्यंत राखून ठेवला आहे.
मन्नन यांनी न्यायालयाला सांगितले की, स्मृती इराणी यांनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत जे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे त्यात १९९६ मध्ये दिल्ली विद्यापीठातून बीए झाल्याचे म्हटले होते. ११ जून २०११ रोजी गुजरातमधून राज्यसभा निवडणूक लढवताना त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बी. कॉमचा एक भाग पूर्ण केल्याचे म्हटले होते. हे अभ्यासक्रम त्यांनी दूरशिक्षणातून पूर्ण केल्याचे म्हटले होते. १६ एप्रिल २०१४ रोजी त्यांनी अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवताना बी. कॉम भाग १ पूर्ण केल्याचे म्हटले होते. मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीची शैक्षणिक पात्रता समाज जाणून घेऊ इच्छितो. आम आदमी पक्षाच्या अमेठीतील उमेदवाराने व काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या वेळी इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा उपस्थित केला होता.