अहमदाबादमध्ये साबरमती आश्रमाजवळ राहणाऱ्या एका २९ वर्षीय शिक्षिकेने शेजाऱ्यावर लैंगिक सुखासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. तिने राणीप पोलीस स्टेशनमध्ये शेजाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. शेजारी अमित मकवाना शरीरसंबंध ठेवण्यासाठी आपल्यावर जबरदस्ती करत होता असा आरोप या शिक्षिकेने केला आहे. संबंधित शिक्षिकेचा विवाह झाला असून तिला दोन मुले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी

अमितच्या पत्नीचे माझ्या नवऱ्याबरोबर प्रेमसंबंध आहेत त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी आपणही प्रेमसंबंध ठेऊ असे तो मला सतत सांगत होता. एकदा घरापर्यंत लिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्याने कारमध्ये माझा विनयभंगही करण्याचा प्रयत्न केला असा आरोप या शिक्षेकेने केला आहे. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अमित आणि हिरेन मकवाना दोन्ही भावांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जून महिन्यात मी शाळेकडे निघालेली असताना अमित मकवानाने अर्ध्या रस्त्यात मला गाठले. तो त्याची गाडी घेऊन आला होता. घरी काही तरी वाईट घडलेय असे सांगून त्याने मला गा़डीत बसवले. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर त्याने माझ्याशी गाडीतच लगट करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस मी त्याच्या गाडीतून बाहेर पडून घरी पोहोचले पण काहीही घडलेले नव्हते.

त्यानंतर एका रात्री त्याने मला भेटण्यासाठी बोलावले. मी भेटायला आली नाही तर आत्महत्या करेन अशी त्याने धमकी दिली होती. जेव्हा मी त्याच्या घराजवळ पोहोचली तेव्हा त्याने माझ्या नवऱ्याचे आणि त्याच्या बायकोचे प्रेमसंबंधांचा आपल्याकडे पुरावा असल्याचा त्याने दावा केला. जेव्हा मी पुरावा मागितला तेव्हा त्याने त्याचा मोबाइल पुढे केला पॉर्न क्लिप सुरु केली. त्यावेळी त्याचा भाऊ हिरेन मी ती पॉर्न क्लिप बघतेय असा फोटो काढण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा मी आरडाओरडा केला तेव्हा दोघे तिथून निघून गेले.