हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरुद्ध नवी दिल्लीतील अशोक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याआधी अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीत म्हटले होते. त्यावेळी अमिताभ यांच्याकडून राष्ट्रगीतातील काही शब्दांचा चुकीचा उच्चार केला गेल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच, राष्ट्रगीत ५२ सेकंदात संपले पाहिजे. मात्र, अमिताभ बच्चन यांना राष्ट्रगीत म्हणण्यासाठी १ मिनिट २२ सेकंद इतका वेळ लागल्याने त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीत म्हणण्यासाठी मानधन घेतल्याचे वृत्त होते. मात्र, अमिताभ यांनी या वृत्ताचे खंडण करत आपण एकही पैसा न घेतल्याचे रविवारी सांगितले.

Story img Loader