स्थायी समितीच्या निवडणुकीत पावित्र्यांचा भंग झाल्याचा आरोप; नव्याने निवडणूक घेण्याची मागणी
पीटीआय, नवी दिल्ली
स्थायी समिती सदस्यांच्या निवडणुकीत मतदान करताना मोबाईल घेऊन जाण्यास नगरसेवकांना मुभा दिल्याने वाद निर्माण झाला आह़े भाजपच्या सदस्यांनी यावर आक्षेप घेतला असून निवडणुकीत पावित्र्यांचा भंग झाल्याचा आरोप केला आह़े ही निवडणूक नव्याने घेण्याची मागणी त्यांनी केली आह़े
भाजप सदस्यांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज शुक्रवापर्यंत तहकूब करण्यात आल़े महापालिकेच्या सभागृहाचे कामकाज बुधवारी रात्रभर सुरू होत़े बुधवारच्या संध्याकाळपासून गुरुवारच्या सकाळपर्यंत नगरसेवकांच्या गोंधळामुळे १५ वेळा सभागृह तहकूब करावे लागल़े महापालिकेच्या सचिवांनी दिल्लीच्या महापौर शेली ओबेरॉय आणि आयुक्त ग्यानेश भारती यांना अहवाल सादर केला असून नव्याने निवडणुका घेण्याची शिफारस केली आह़े.
मतदान करताना नगरसेवकांना मोबाइल फोन घेऊन जाण्यास महापौरांनीच परवानगी दिली होती, असा आरोप करण्यात येत आह़े त्यामुळे सभागृहात भाजप सदस्यांनी गोंधळ घातला आह़े मोबाइल घेऊन गेल्याने निवडणूक प्रक्रियेत विघ्न आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र आपच्या नेत्यांनी महापौरांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. महापौर शेली ओबेरॉय आणि आयुक्त ज्ञानेश भारती यांना सादर केलेल्या अहवालात पालिका सचिवांनी असे म्हटले आहे की, स्थायी समितीचे सहा सदस्य निवडण्यासाठी पुरेशा मतपत्रिका उपलब्ध नाहीत आणि ही निवडणूक नव्याने घेणे महत्त्वाचे आहे.