नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान उमेदवारीनंतर ‘एनडीए’ला रामराम ठोकणाऱया नितीशकुमारांचा ‘जदयू’ पक्ष काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या तयारीत असताना भाजप नेते अरुण जेटली यांनी नितीशकुमारांना सबुरीचा सल्ला देऊ केला आहे.
बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस नितीशकुमारांचा केवळ राजकीय वापर करून घेईल दुसरे काहीच करु शकत नाही याचा त्यांनी विचार करावा असे अरुण जेटली म्हणाले. बिहारच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी मदत करण्याचे सोडून केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी काँग्रेस नितीशकुमारांचा वापर करुन घेईल असा विश्वासपूर्ण दावा अरुण जेटलींनी यावेळी केला.
बिहारला विशेष राज्याच्या दर्जा देण्याच्या मागणीवरून नितीशकुमारांनी पटणामध्ये केलेल्या निषेधानंतर अरुण जेटलींनी हे वक्तव्य केले आहे. नितीशकुमारांना काँग्रेसच्या मार्गावर केवळ फसवणुकीचे धक्केच बसतील विकासात्मक दृष्टीकोनातून त्यांना आणि बिहारला काहीच मिळणार नाही असेही जेटली म्हणाले.
काँग्रेसकडून नितीशकुमारांचा केवळ राजकीय वापर – अरूण जेटली
नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान उमेदवारीनंतर 'एनडीए'ला रामराम ठोकणाऱया नितीशकुमारांचा 'जदयू' पक्ष काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या तयारीत असताना भाजप नेते अरुण जेटली यांनी नितीशकुमारांना सबुरीचा सल्ला देऊ केला आहे.
First published on: 03-03-2014 at 02:22 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cong led jdu up the garden path on special status jaitley