आगामी निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तारूढ झाला तर पंतप्रधानपदासाठी साहजिकच पक्षाध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्यापैकीच एकाची निवड होईल, असे केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी रविवारी येथे सांगितले. आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण आहे, हे प्रत्येकास ठाऊक आहे. त्यामुळे त्यांच्यापैकीच एक जण पंतप्रधानपदी आरूढ होईल, असे थरूर यांनी कोणाचे नाव न घेता सूचित केले.
पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यात स्पर्धा होईल काय, हा प्रश्न थरूर यांनी धुडकावून लावला आणि निवडणुका होण्यापूर्वीच देशाचा पंतप्रधान कोण हे जाहीर करण्याची आवश्यकता काँग्रेसला वाटत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या भारतात अमेरिकेसारखी निवडणूक पद्धती नाही. अमेरिकेत अध्यक्षांची निवड थेट होते तर भारतात लोक पक्षाला निवडतात आणि निवडून आलेले सदस्य त्यांचा नेता शोधतात, याकडे थरूर यांनी लक्ष वेधले. नरेंद्र मोदी यांच्यात पंतप्रधानपद सांभाळण्याचे गुण आहेत काय असे विचारले असता ‘नो कॉमेण्ट्स’ असे उत्तर थरूर यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा