१९८४च्या शीखविरोधी दंगलीला आणि १९८९च्या भागलपूरमधील दंगलीला कॉंग्रेस तर २००२च्या गुजरातमधील दंगलीला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंगळवारी केला.
या सर्व दंगली देशाच्या प्रतिमेवर डाग असून, प्रत्येक भारतीयाला त्यामुळे लाज वाटत असल्याचे मतही त्यांनी मांडले. या दंगली घडवून आणणाऱयांनी त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असेही नितीशकुमार म्हणाले.
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत १९८४च्या शीखविरोधी दंगलींमध्ये काही कॉंग्रेस नेत्यांचा सहभाग होता, असे म्हटले होते. दंगलींमध्ये सहभागी असणाऱयांना कायद्याने शिक्षा झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावर पत्रकारांनी नितीशकुमार यांना प्रतिक्रिया विचारल्यावर त्यांनी ८४ मधील दंगलींना कॉंग्रेसच जबाबदार असल्याचे सांगितले. भागलपूरमध्ये १९९० मध्ये भडकलेल्या दंगलीप्रकरणी दोषींना शिक्षा देण्याइतपत पुरावे असतानाही लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय जनता दलाच्या सरकारने १९९० मध्ये दंगलींची चौकशीच थांबविण्याचे आदेश दिले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा