पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीची उपांत्यफेरी असल्याचा युक्तिवाद कॉंग्रेसने शुक्रवारी फेटाळला. कॉंग्रेसच्या धोरणांमुळे पक्षाला या पाचही राज्यांमध्ये नक्कीच बहुमत मिळेल, अशी आशा पक्षाचे प्रवक्ते मीम अफजल यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, निवडणुकांमध्ये उपांत्य फेरी किंवा उपांत्यपूर्व फेरी असे काही नसते. आमच्यासाठी प्रत्येक निवडणूक ही अंतिम फेरीच असते. आम्ही पाच राज्यांमधील निवडणुकांकडे अंतिम फेरी म्हणूनच बघतो आहोत. आम्ही पक्षाचे कार्यक्रम आणि धोरण घेऊन निवडणुकीत मतदारांपुढे जाऊ आणि आम्हाला नक्कीच बहुमत मिळेल. कोणत्याही एका व्यक्तीला समोर ठेवून कॉंग्रेस निवडणूक लढवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुका होऊ घातलेल्या पाच राज्यांपैकी दिल्ली, राजस्थान आणि मिझोराममध्ये सध्या कॉंग्रेसचीच सरकारे आहेत.