२०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसने पक्षनिधीसाठी तयारीला सुरुवात केली आहे. यासाठी पार्टी क्राऊड फंडिग मोहीम सुरू करण्यात येणार आहे. डोनेट फॉर देश असं या मोहिमेचं नाव असून १८ डिसेंबरपासून याची सुरुवात होणार आहे. पक्षातील सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी या मोहिमेसाठी कमीत कमी १३८० रुपयांचं योगदान देण्याचं आवाहन केलं आहे.
काँग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल यांनी शनिवारी पत्रकार परिषद आयोजित करून या मोहिमेविषयी माहिती दिली. वेणुगोपाल म्हणाले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला आपल्या ऑनलाईन क्राऊडफंडिग अभियान डोनेट फॉर देश मोहिमेचे अनावरण करताना अभिमान वाटत आहे. ही मोहीम १९२०-२१ साली महात्मा गांधीच्या ऐतिहासिक टिळक स्वराज्य फंड मोहिमेपासून प्रेरित होऊन सुरू करण्यात येत आहे. श्रेष्ठ भारत बनवण्यासाठी पक्ष सशक्त बनवणे हा यामागचा उद्देश आहे. या अभिनायाची अधिकृत सुरुवात पक्षाचे अध्यक्ष १८ डिसेंबरपासून दिल्लीतून करणार आहेत.
वेणुगोपाल पुढे म्हणाले, “आम्ही आमच्या राज्यस्तरीय पदाधिकारी, निवडून आलेले लोकप्रतिनिधी, डीसीसी अध्यक्ष, पीसीसी अध्यक्ष आणि AICC च्या पदाधिकाऱ्यांना प्रत्येकी कमीत कमी १३८० रुपयांचं योगदान देण्याचे आवाहन करतो.”
द असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने या वर्षी सप्टेंबरमध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानुसार देशातील ८ राष्ट्रीय पक्षांच्या घोषित संपत्तीत एका वर्षात १५३१ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. २०२०-२१ मध्ये या पक्षांची मालमत्ता ७,२९७.६२ कोटी रुपये होती. २०२१-२२ मध्ये त्यांची संपत्ती ८,८२९.१६ कोटी रुपये झाली.
भाजप, काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष (NCP), बहुजन समाज पक्ष (BSP), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI), CPI (Maoist), तृणमूल काँग्रेस आणि नॅशनल पीपल्स पार्टी (NPEP) या राष्ट्रीय पक्षांची ही घोषित संपत्ती आहे.
पक्ष | २०२०-२१ (सर्व रक्कम कोटींमध्ये) | २०२१-२२ (सर्व रक्कम कोटींमध्ये) | फरक |
भाजपा | ४,९९० | ६,०४६ | +१०५६ |
काँग्रेस | ६९१.११ | ८०५.६८ | +११४ |
CPI (M) | ६५४.७९ | ७३५.७७ | +८०.९८ |
BSP | ७३२.७९ | ६९०.७१ | -४२ |
TMC | १८२ | ४५८ | +२७६ |
राष्ट्रीय काँग्रेस पक्ष | ३०.९३ | ७४.५३ | +४३.६ |
CPI | १४ | १५.७ | +१.७ |
NPP | १.७ | १.८ | +०.८ |