काँग्रेस पक्षाची अवस्था बुडत्या जहाजासारखी झाली असून त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनीही पक्षाला बुडविण्याचे ठरविलेले दिसते अशी खरपूर टीका भाजपचे नेते अरुण जेटली यांनी केली.
जेटली म्हणाले, काँग्रेसचे जहाज तर बुडणारच आहे परंतु, काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांनीही बुडण्याची तयारी केलेली दिसते. काँग्रेसचे काही नेते निवडणूक लढविण्यीची तयारी दर्शवत नाहीत, तर काही प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण देऊन निवडणूकीपासून दूर जात आहेत. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनीच पक्षाचे जहाज बुडविण्यीची तयारी केली आहे. असेही अरुण जेटली आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून म्हणाले.
वाराणसीतून नरेंद्र मोदीच!
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत जेटली म्हणाले की, युवराजांच्या मते जनमत चाचण्यांचे अहवाल खोटे आहेत आणि यावेळीच्या निवडणूकीत काँग्रेसला २००९ सालापेक्षा अधिक मते मिळतील, जर ते असे आपल्या काँग्रेसजनांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी बोलत असतील, तर ठीक आहे. परंतु, राहुल गांधी खरेच जर जनमत चाचण्या खोट्या आणि काँग्रेसला यावेळी जास्त यश मिळेल असे समजत असतील, तर हा त्यांचा गैरसमज आहे. ते सत्यापासून दूर जाण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. असेही जेटली म्हणाले.
काँग्रेसकडून नितीशकुमारांचा केवळ राजकीय वापर – अरूण जेटली

Story img Loader