नवी दिल्ली : ‘इंडिया’ महाआघाडीतील घटक पक्षांच्या जागावाटपांच्या चर्चाना काँग्रेसने गती दिली असून सोमवारी आम आदमी पक्षाशी दिल्ली, गोवा, गुजरात या राज्यांतील जागांचा प्राथमिक आढावा घेण्यात आला. काँग्रेसने रविवारी बिहारमधील जागांसाठी राष्ट्रीय जनता दलाशीही चर्चा केली. काँग्रेसच्या राष्ट्रीय आघाडी समितीचे समन्वयक मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी ‘आप’चे नेते अतिशी, संदीप पाठक, सौरभ भारद्वाज यांनी सुमारे अडीच तास चर्चा केली. काँग्रेसच्या वतीने वासनिक यांच्यासह अशोक गेहलोत, दिल्ली काँग्रेसचे प्रमुख अरविंदसिंग लवली, सलमान खुर्शीद, मोहन प्रकाश बैठकीला उपस्थित होते.

‘आप’ व काँग्रेसच्या नेत्यांनी वेगवेगळय़ा मुद्दय़ांवर सकारात्मक चर्चा केली आहे. ही चर्चेची पहिली फेरी होती, दोन दिवसांनंतर आम्ही जागावाटपासंदर्भात पुन्हा चर्चा करणार आहोत. त्यानंतर जागावाटपावर अंतिम निर्णय घेतला जाईल. लोकसभेची निवडणूक आम्ही एकत्र लढू व भाजपचा तगडा मुकाबला करू,’ असे मुकुल वासनिक यांनी बैठकीनंतर सांगितले.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा >>>Bilkis Bano Case : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बिल्किस बानोची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “माझ्यासारख्या महिलेचा प्रवास…”

केजरीवालांचा काँग्रेसवर दबाब

दिल्लीत बैठक सुरू असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुजरातमध्ये होते, तिथे त्यांनी भरूच लोकसभा मतदारसंघातून ‘आप’चे कार्यकारी अध्यक्ष चैतार वसावा यांच्या उमेदवारीची कार्यकर्त्यांपुढे अधिकृत घोषणा केली. विधानसभा निवडणुकीत ‘आप’मुळे झालेल्या मतांच्या विभाजनाचा मोठा फटका काँग्रेसला बसला होता. त्यामुळे काँग्रेसला गुजरातमध्ये ‘आप’शी जागावाटप करण्याशिवाय गत्यंतर उरलेले नाही.

दिल्ली-गोवा-गुजरातसाठी दुसरी फेरी

दिल्लीतील ७ जागांपैकी किमान तीन जागा लढण्याची काँग्रेसला अपेक्षा आहे. गोव्यात प्रत्येकी एक जागा दोन्ही पक्ष लढवण्याची शक्यता आहे. गुजरातमधील जागावाटप हाच कळीचा मुद्दा ठरला असून त्यासंदर्भात दुसऱ्या टप्प्यातील चर्चेमध्ये वाटाघाटी केल्या जातील.

हेही वाचा >>>ब्रिजभूषण सिंह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने दीपाली सय्यद ट्रोल, युजर्स म्हणाले; “बलात्काराचे आरोप असणाऱ्या…”

बिहारसाठी रस्सीखेच

बिहारमधील ४० जागांसाठी काँग्रस, जनता दल (सं) व राष्ट्रीय जनता दल या तीनही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी रविवारी वासनिक समितीशी जागावाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा केली. राज्यातील महाआघाडीत काँग्रेस हा सर्वात छोटा पक्ष असून अन्य दोन पक्ष काँग्रेसला ५-६ जागा देण्यास तयार आहेत, मात्र काँग्रेसने अधिक जागांची अपेक्षा व्यक्त केली आहे.

पंजाब-हरियाणा अधांतरी

’‘आप’ व काँग्रेसमध्ये पंजाब व हरियाणा या दोन राज्यांतील तिढा मात्र सुटलेला नाही.

’या राज्यांतील दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पक्षनेतृत्वाला आघाडी न करण्याचा सल्ला दिला आहे.

’‘आप’शी आघाडी केल्यास पक्षाचे विधानसभा निवडणुकीत नुकसान होण्याची भीती प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली.

’दोन्ही राज्यांबाबत काँग्रेस नेतृत्व राज्यातील नेत्यांशी बोलून निर्णय घेणार आहे.

Story img Loader