‘काँग्रेस दर्शन’ या काँग्रेस पक्षाच्या मासिकात पं. जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वडिलांबाबत प्रसिद्ध झालेल्या वादग्रस्त लिखाणाबाबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी माफी मागितल्याने पक्षाने या वादावर पडदा टाकला आहे. निरुपम हे या मासिकाचे संपादक आहेत. पक्षाच्या मासिकात नेतृत्वाबद्दल प्रसिद्ध झालेले वादग्रस्त लिखाण प्रतिमा मलीन करणारे असून त्याची जबाबदारी निरुपम यांनी स्वीकारली आणि आपला बिनशर्त माफीनामा पक्षाकडे सुपूर्द केला.

Story img Loader