केंद्रीय रेल्वे आणि कोळसा मंत्री पियूष गोयल यांच्यावर काँग्रेसने गंभीर आरोप केले आहेत. गोयल यांनी एका खासगी कंपनीतील आपला हिस्सा त्याच्या दर्शनी मूल्याच्या हजारपट अधिक किंमतीने ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका कंपनीला विकल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या व्यवहारात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करत गोयल यांना पदावरून हटवावे व त्यांच्या स्वतंत्र चौकशीची मागणी काँग्रेसने केली आहे. दरम्यान, भाजपाने गोयल यांच्या बचावासाठी उडी घेतली असून हा अत्यंत आधारहीन व चुकीचा आरोप असल्याचे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एक वेबसाइटच्या वृत्ताचा हवाल देत काँग्रेसने हा आरोप केला आहे. गोयल यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये आपले आणि आपल्या पत्नीच्या मालकीच्या कंपनीचे सर्व शेअर्स अजय पिरामल यांच्या कंपनीला दर्शनी मूल्याच्या एक हजार पट अधिक किंमतीने विकली. याची माहिती त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला दिली नाही. हा व्यवहार गोयल यांनी मंत्रिपद स्वीकारल्यानंतर चार महिन्यानंतर झाला होता. पिरामल समूह अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातही कार्यरत आहे. गोयल त्यावेळी वीज आणि अपारंपारिक ऊर्जा मंत्री होते.

काँग्रेसने गोयल यांच्या कायदेशीर व्यवसायावर चुकीचे आरोप केल्याचे भाजपाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. तर या व्यवहारामुळे मोदी सरकारच्या एका वरिष्ठ कॅबिनेट मंत्र्याची पोल खोल झाल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. ‘द वायर’ या वेबसाइटने आपल्या एका लेखात हा आरोप केला होता. गोयल यांनी पंतप्रधान कार्यालयाला २०१४ आणि २०१५ मध्ये आपली संपत्ती आणि व्यवहारांबाबत जी माहिती दिली होती. त्यामध्ये त्यांच्या मालकीच्या फ्लॅशनेट इन्फो सोल्यूशन्स (इंडिया) प्रा. लि. मध्ये खुलासा केला नव्हता आणि त्याची विक्री केल्याचीही माहिती दिली नव्हती.

भाजपाने म्हटले की, जेव्हा हा व्यवहार झाला होता. त्यापूर्वीच गोयल यांनी आपली संपत्तीबाबत सार्वजनिक खुलासा केला होता. हा व्यवहार गोयल मंत्री होण्यापूर्वी झाला होता. काँग्रेस खोटा आरोप करत आहे.