सध्या अयोध्येत मंदिर उभारण्यासाठी राजस्थानातून शिळा आणण्यात आल्या असून मंदिर समितीचे प्रमुख नृत्यगोपालदास यांनी शीलापूजनही केले आहे. या परिस्थितीत संघ परिवारातील िहदुत्ववादी संघटना व इतिहासकार यांच्यात चांगलीच जुंपली असताना इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या अधिवेशनात अयोध्येत मंदिर उभारणीसाठी चालू असलेल्या हालचालींचा निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आला. बाबरी मशीद जेथे होती तेथे राम मंदिर उभारण्याचे प्रयत्न विश्व िहदू परिषद व काही संघटनांनी सुरू केले आहेत. इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे ७६ वे अधिवेशन पश्चिम बंगालमधील माल्डा येथे सुरू असून त्यात हा निषेधाचा ठराव करण्यात आला.
ठरावात म्हटले आहे की, अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी शीळा आणण्यात आल्या आहेत, हा कायद्याचा भंग आहे. लोकांच्या भावना भडकावणाऱ्या अशा कृतींना केंद्र व राज्य सरकारने पायबंद घालावा, असे आवाहन इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या वतीने आम्ही करीत आहोत.
ख्यातनाम इतिहासकार इरफान हबीब, आदित्य मुखर्जी, शिरीन मौसवी व बी. पी. साहू, इंदू बंगा यावेळी उपस्थित होते. इंडियन हिस्ट्री काँग्रेसने १९८४ मध्ये बाबरी मशिदीचे संरक्षण करण्यात यावे असा ठराव केला होता. बाबरी मशीद मध्ययुगीन काळात म्हणजे १५२८ मध्ये बांधण्यात आली होतो व शारकी वास्तुरचनेचा नमुना होती, पण आम्ही ठराव करूनही १९९२ मध्ये काही लोकांनी ती पाडली त्याचा देशात निषेध झाला. बाबरी मशीद पाडण्याचा कट नियोजित होता व नवीन राम मंदिराला जागा मिळावी हा हेतू त्यात होता असे यावेळी सांगण्यात आले.