इटलीच्या अपुलिया शहरात नुकतीच जी-७ परिषद पार पडली. या परिषदेवेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासह अनेक राष्ट्रांच्या प्रमुखांशी संवाद साधला. मोदी या दौऱ्यावेळी जगभरातील अनेक नेत्यांना भेटले तरी सर्वाधिक चर्चा झाली ती मोदी आणि पोप फ्रान्सिश (ख्रिस्त धर्मगुरू) यांच्या भेटीची. इटलीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली होती. या भेटीवरून काँग्रेसने मोदींना चिमटा काढला होता. तर भाजपाने काँग्रेसवर टीका केली. या टीकेनंतर काँग्रेसने ख्रिश्चन समुदायाची माफी मागितली आहे. जी-७ परिषदेत मोदी पोप फ्रान्सिस यांना भेटले. या भेटीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर केरळ काँग्रेसने समाजमाध्यमांवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये लिहिलं होतं की “अखेर पोप यांना देवाला भेटण्याची संधी मिळाली.”

मोदी यांनी अलीकडेच काही वादग्रस्त वक्तव्ये केली होती. ते म्हणाले होते की, “त्यांना देवाने काही उद्देश्य डोळ्यासमोर ठेवून पृथ्वीवर पाठवलं आहे”, तसेच एका मुलाखतीत ते म्हणाले, “मी जैविकदृष्ट्या जन्मलेलो नाही”, “मी गंगा मातेचा पुत्र आहे.” मोदींच्या याच वक्तव्यांचा संदर्भ देत काँग्रेसने म्हटलं होतं की “अखेर पोप देवाला भेटले”.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी

दरम्यान, काँग्रेसने या पोस्ट समाजमाध्यमांवरून हटवल्या आहेत. मात्र भाजपाने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाने आरोप केला आहे की “काँग्रेसने समस्त ख्रिश्चन बांधव, पोप आणि देवाचा अपमान केला आहे.”

केरळ भाजपाचे अध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “काँग्रेसचं एक्स हँडल कट्टरपंथी आणि शहरी नक्षलवाद्यांकडून चालवलं जात आहे. आता हे लोक पोप फ्रान्सिस आणि ख्रिश्चन समुदायाचा अपमान करू लागले आहेत.” सुरेंद्रन यांनी याप्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल आणि राहुल गांधींकडे याचं उत्तर मागितलं आहे. तर, केरळ भाजपाचे सरचिटणीस जॉर्ज कुरियन म्हणाले, “काँग्रेसच्या या पोस्ट आक्षेपार्ह आहेत. यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. काँग्रेसने प्रामुख्याने केरळमधील लोकांचा अपमान केला आहे.”

हे ही वाचा >> ईव्हीएम प्रकरणावर कपिल सिब्बल यांची प्रतिक्रिया, “राजीव चंद्रशेखर हे एलॉन मस्कपेक्षाही…”

भाजपाच्या या आरोपांनंतर काँग्रेसने पोप फ्रान्सिस यांच्या या वक्तव्याचा हवाला देत उत्तर दिलं आहे. “देवाची मस्करी करणं म्हणजे अधर्म नाही”, असं काँग्रेसने म्हटलं आहे. काँग्रेसने सुरेंद्रन आणि जॉर्ज कुरियन यांना टॅग करत म्हटलं आहे की, “बेटर लक नेक्स्ट टाईम…” केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व्ही. टी. बलराम यांनी पक्षाच्या पोस्टचा बचाव करत म्हटलं आहे, “हे केवळ एक व्यंग होतं. यातून केवळ मोदींच्या अलीकडच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया दिली होती. मोदी स्वतःच म्हणाले होते की ते सामान्य व्यक्ती नाहीत, त्यांना ईश्वराने पृथ्वीवर धाडलं आहे.” दरम्यान, विरोधकांच्या टीकेनंतर केरळ काँग्रेसने त्यांची पोस्ट डिलीट केली आहे. तसेच यातून ख्रिश्चन बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही माफी मागतो, असं म्हटलं आहे.